आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीने वाढदिवसाच्‍या दिवशीच केला प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - मध्‍य प्रदेशातील एका युवकाने आपल्‍या फेसबुक प्रेयसीसाठी तिच्‍या पतीचा खून केला. विशेष म्‍हणजे त्‍याच्‍या प्रेयसीने आपण अविवाहित असल्‍याचे त्‍याला सांगितले होते. यानेही आपण ATS शिपाई आहोत म्‍हणून तिला फेसबुकवर थाप मारली होती. यशपाल असे खून झालेल्‍या व्‍यक्‍तीचे तर करण आणि पूजा अशी आरोपींची नावे आहेत.
काय आहे प्रकरण...
> पूजा ही विवाहित होती. तिने अंजली भंडारी नावाने फेसबुक आयडी तयार केली होती.
> यात तिने बहीण, भावजी आणि इतर नातेवाइकांचे फोटो पोस्‍ट केले होते. परंतु, पती यशपालचा एकही फोटो पोस्ट केला नव्‍हता.
> एवढेच नाही आपले लग्‍न झालेले नाही, असेही तिने फेसबुकवर भासवले.
> फेसबुक मित्र यादीत तिचे पुरुष मित्रच अधिक असून, तिने काही मुलांच्‍या पोस्‍टवर आक्षेपार्ह कमेंटसुद्धा केल्‍या होत्‍या.
करणने पोस्‍ट केला पोलिसाच्‍या वेशातील फोटो
> आरोपी करणने स्‍वत:च्‍या प्रोफाइलमध्‍ये सर्वच माहिती खोटी दिली होती.
> आपण अँटी टेरेरिस्ट स्क्वॉड (एटीएस) मध्‍ये शिपाई असून, तमीळनाडूतील कोयंबटूर पोस्‍टिंग झालेली आहे, असे त्‍याने प्रोफाइलमध्‍ये लिहिले होते.
> एवढेच नाही तर पोलिसाच्‍या गणवेशातील एक फोटोसुद्धा त्‍याने पोस्‍ट केला.
> त्‍याला या बाबत पोलिसांनी विचारले असता आपल्‍या एका मित्राने हे प्रोफाइल तयार करून दिल्‍याचे त्‍याने सांगितले.
> प्रत्‍यक्षात करण हा फर्नीचर दुकानात काम करतो.
यशपाल आणि पूजाचा होता प्रेमविवाह
यशपाल आणि पूजाचा प्रेमविवाह होता. लग्‍नानंतर दोघांमध्‍ये पटत नव्‍हते. अशातच पूजाचे फेसबुकवरून करणसोबत सूत जुळेल. आपल्‍या प्रेमातील अडसर दूर करण्‍यासाठी करणने यशपालचा काटा काढला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)