आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासरा करत होता बलात्‍कार, करणार होती आत्‍महत्‍या, पोलिसांनी अडवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर - 'माझा सासराच माझ्यावर बलात्‍कार करतो', अशी तक्रार घेऊन आलेल्‍या एका महिलेने पोलिस अधीक्षकांच्‍या दालनात आपल्‍या चिमुकल्‍याला जमिनीवर आदळले. शिवाय आपली जगण्‍याची इच्‍छाच मेली असून, आता आत्‍महत्‍या करणास जाणार आहे, असे सांगितले. त्‍यावर एकच गोंधळ उडाला. मोठी कसरत करून पोलिसांनी तिला अडवले.
काय आहे प्रकरण ?
- ग्वाल्हेरच्‍या एका युवतीचे भोपाळ येथील मंगलसिंग नावाच्‍या युवकासोबत लग्‍न झाले होते.
- मात्र, लग्‍नानंतर तिच्‍या सासऱ्याने तिच्‍याशी जबरदस्‍ती शरीर संबंध बनवण्‍याचा प्रयत्‍न केला.
- तिने त्‍याला विरोध केला असता त्‍याने मारहाण करून रेप केला.
- या बाबत पतीला सांगितले तर त्‍यानेही गप्‍प राहून त्‍याचीच बाजू घेतली.
- त्‍यावर भोपाळ पोलिसांत तक्रार दिली. मात्र, त्‍यांनी काहीच कारवाई केली, असा आरोप पीडित तरुणीने केला.

ग्वाल्हेर एसपी कार्यालयात पोहोचली न्‍यायासाठी

पीडित युवती मंगळवारी ग्वाल्हेर एसपी कार्यालयात न्‍यायासाठी पोहोचली. मात्र, येथेही तिचे म्‍हणणे कुणी ऐकून घेत नसल्‍याचे पाहून तिने आपल्‍या चिमुकल्‍या मुलाला जमिनीवर आदळले आणि आता आपण आत्‍महत्‍या करण्‍यास जात असल्‍याचे सांगितले. त्‍यावर पोलिस निरीक्षक अनिता मिश्रा आणि इतर महिला पोलिसांनी तिला पकडले आणि पती आणि सासऱ्यावर कारवाई करण्‍याचे आश्‍वासन दिले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...