आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी मध्‍यरात्री पकडली गाणे वाजवत फि‍रणारी कार, या अवस्‍थेत आढळली तरुणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - निर्मुष्‍य रस्‍त्‍यावर मोठ्या आवाजात गाणे वाजवून वेगाने धावणाऱ्या एका कारला पोलिसांनी अडवले. यात एका तरुणीसह तीन तरुण मद्यधुंद अवस्‍थेत आढळून आले. विशेष म्‍हणजे कारमधील तरुणी एवढी नशेत होती की तिला नीट उभेसुद्धा राहता येत नव्‍हते. हा प्रकार रविवारी पहाटे 2 वाजताच्‍या सुमारास घडला. पोलिसांनी गाडी मालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला.
नेमके काय झाले...
> मध्‍यरात्री डीआयजी संतोषसिंह पलासिया घरी जात होते. त्‍यांच्‍यासमोरून एक काळ्या रंगाची कार खूप वेगाने आणि मोठ्या आवाजात गाणे वाजवत गेली.
> कारमध्‍ये तरुणी बसलेली त्‍यांना दिसली.
> शंका आल्‍याने त्‍यांनी कार थांबवण्‍याचा प्रयत्‍न केला.
> पण, चालकाने सुसाट वेगाने कार दामटली.
> त्‍या नंतर त्‍यांनी वायरलेसवर संदेश पाठवून कार थांबवण्‍याचे आदेश दिले.
> पोलिसाच्‍या एका पथकाने या कारचा पाठालाग करून तिला पकडले.
> कारमधील युवतीसह तीनही तरुण मद्यधुंद अवस्‍थेत होते.

काय सांगितले पोलिसांना
> पोलिसांनी त्‍यांची चौकशी केली असता कार चालक अजित पटेल याने सांगितले, ''मी होशंगाबाद जिल्‍ह्यातील व्‍यापारी संघाच्‍या अध्‍यक्षचा मुलगा आहे, चित्रपट पाहून आम्‍ही घरी जात आहोत'', अशी माहिती त्‍याने दिली.
> त्‍याच्‍यासोबत असलेली तरुणी एका किरायाच्‍या खोलीत राहाते.
> पोलिसांनी अजीत विरुद्ध गुन्‍हा दाखल करून तरुणीला तिच्‍या घरी सोडले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...