आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नर्सही लिहून देऊ शकणार आता औषधांचे प्रिस्क्रिप्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - देशातील लाखो परिचारिका (नर्सेस)वर्षभराचा नर्सेस प्रॅक्टिशनर इन क्रिटिकल कोर्स पूर्ण करून डॉक्टरांप्रमाणाचे औषधे लिहून (प्रिस्क्रिप्शन) लिहून देऊ शकतील. तसेच छोट्या शस्त्रक्रियाही करू शकतील. त्यासाठी केंद्र सरकारने एका तयार अभ्यासक्रमाला मंजुरी देण्याचे जवळपास निश्चित केले आहे. बीएसस्सी, नर्सिंग, एमएस्सी नर्सिंगसारखे अभ्यासक्रम करून नर्स बनलेल्या हजारो परिचारिकांना या अभ्यासक्रमाचा फायदा होणार आहे. यामुळे त्या सर्दी, खोकला, ताप यासारख्या छोट्या आजारांवरील उपचार ग्रामस्थांना त्यांच्या भागातच उपलब्ध होतील. याआधी सरकारने औषध विक्रेत्यांना औषधे लिहिण्याचा अधिकार यापूर्वीच बहाल केलेला आहे. देशात डॉक्टरांची अपुरी संख्या लक्षात घेऊन ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे हा वर्षभराचा अभ्यासक्रम केल्यानंतर परिचारिका स्वत:चा चिकित्सकीय व्यवसाय (क्लिनिक) सुरू करू शकतील. आतापर्यंत त्यांच्याकडे केवळ स्टाफ नर्स म्हणून नोकरी करण्याचाच पर्याय उपलब्ध होता. बीएस्सी नर्सिंग व एमएस्सी नर्सिंग केल्यानंतरही परिचारिकांना डॉक्टरांच्या दिशानिर्देशानुसारच काम करावे लागत होते. परंतु हा अभ्यासक्रम केल्यानंतर नर्सेस देशातच स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतील. त्यासाठी सर्व राज्यांमध्ये २०१७ पासून नर्सेस प्रॅक्टिशनर इन क्रिटिकल हा अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी करण्यात येत आहे. परिचारिकांना औषधे लिहून देण्यासाठी अथवा छोट्या शस्त्रक्रिया करण्यासाठी एका वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. तो पूर्ण केल्यानंतर त्यांना छोट्या शस्त्रक्रियांचादेखील अधिकार मिळणार आहे. लाखो परिचारिकांना त्याचा लाभ होणार आहे. केंद्र सरकारने याबाबत नर्सेस रजिस्ट्रेशन कौन्सिलकडून तसेच सर्व राज्यांकडून यासंदर्भात सूचना मागवण्यात आल्या होत्या. अनेक राज्यांनी हा अभ्यासक्रम लवकर सुरू करण्याबाबत स्वारस्य दाखवले आहे. ग्रामीण भागात डॉक्टर जाण्यास तयार होत नाहीत. त्या ठिकाणी रुग्णांवर उपचार करण्यासाठी अशा परिचारिका महत्त्वाची भूमिका बजावू शकतील.
परिचारिकांना मिळणार यूआयडी
आधार कार्डच्या धर्तीवर परिचारिकांना केंद्र सरकारकडून एक यूआयडी क्रमांक देणार आहे. त्याआधारे त्यांनी एकदा नोंदणी केल्यावर त्यांना नंतर एका राज्यातून दुसऱ्या राज्यांत नोकरीसाठी जाताना पुन्हा पुन्हा वेगळी नोंदणी करण्याची गरज भासणार नाही. तसेच एकच नर्स अनेक रुग्णालयात काम करण्याच्या िकंवा डॉक्टरांकडून तशी फसवेगिरी करण्याच्या प्रकारांना आळा बसू शकेल. इंडियन नर्सिंग कौन्सिलने सर्व राज्यांना तीन महिन्यांत यूआयडीचे काम पूर्ण करण्याचे आदेश िदले आहेत.
बातम्या आणखी आहेत...