आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्‍य प्रदेश : गर्ल्स हॉस्‍टेलमध्‍ये रात्री येत होते मुलं, महिला आयोगाकडे तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपली बाजू मांडताना सीमा शाक्य. - Divya Marathi
आपली बाजू मांडताना सीमा शाक्य.
भोपाळ (मध्य प्रदेश) - भोपाळमधील प्रोफेसर्स कॉलोनीमध्‍ये असलेल्‍या कमला नेहरू गर्ल्स हॉस्‍टेलमधील दोन युवतींमुळे इतर सर्वच युवती त्रस्‍त झाल्‍या आहेत. त्‍यांच्‍या विरोधात वारंवार तक्रार करून काहीच कारवाई होत नसल्‍याने सोमवारी होस्‍टेलमधील मुलींनी थेट महिला आयोगाकडे न्‍यायाची मागणी केली. आयोगाच्‍या अध्‍यक्ष लता वानखेडे यांनी होस्‍टेलला भेट देऊन पाहणी केली.
रात्री येतात मुलं...
> या होस्‍टेलची क्षमता 150 असताना येथे 250 मुली राहतात.
> यातील दोन सीनियर मुली इतर मुलींसोबत गैरव्‍यवहार करतात. एवढेच नाही मध्‍यरात्री देशी कट्टा घेऊन फि‍रतात, असा आरोप इतर मुलींनी केला आहे.
> शिवाय त्‍या या ठिकाणी रात्री-बेरात्री मुलांना घेऊन येतात.
> त्‍यामुळे वातावरण बिघडत असल्‍याचा आरोपही इतर तरुणींनी केला.

आपबिती: सर्वांच्‍या पुढे फाडले माझे कपडे...

> गर्ल्स होस्‍टेलमधील विद्यार्थिनी सृष्‍टी उइके हिने महिला आयोगाच्‍या अध्‍यक्ष लता वानखेडे यांना आपबिती सांगितली. ती म्‍हणाली, 2011 मध्‍ये मी शिक्षणासाठी भोपाळला आली. तेव्‍हापासून जिल्‍हाधिकाऱ्यांच्‍या परवानगीने होस्‍टेलमध्‍ये राहत आहे.
> येथे राहणाऱ्या दोन सीनियर प्रीती आणि सीमा शाक्य या भोपाळच्‍याच रहिवासी आहेत. मात्र, तरीही त्‍या 8 वर्षांपासून होस्‍टेलमध्‍ये राहतात.
> त्‍या ज्‍युनियरकडून जेवण बनवून घेतात. कपडे धुवायला लावतात.
> तीन महिन्‍यांअगोदर मी त्‍यांना स्‍वयंपाकासाठी नकार दिला तर सर्वांसमोर त्‍यांनी माझे कपडे फाडून मला मारहाण केली.
> या बाबत वार्डनकडे 100 पेक्षा अधिक वेळ तक्रार केली. तसेच आदिवासी कल्याण विभाग, श्यामला हिल्स पोलिस ठाण्‍यात तक्रार दिली. मात्र, काहीही कारवाई केली गेली नाही, असा आरोप तिने केला.
वार्डन म्‍हणाली, माझ्या जिवाला धोका
होस्‍टेलची वार्डन अनस्तासिया टोपे म्‍हणाली, या दोन मुलींची प्रचंड दहशत आहे. जिवाच्‍या भीतीने मी आतापर्यंत चूप बसले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...