आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षिका ओढत होती प्रेम जाळ्यात, बनवत होती अश्‍लील सीडी, झाला खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जावरा (मध्‍यप्रदेश) - येथील साईधाम कॉलोनीमध्‍ये किरायाने राहणाऱ्या एका शिक्षिकेचा खून झाला. ही शिक्षिका पुरुषांना आपल्‍या प्रेम जाळ्यात ओढून शारीरिक संबंध प्रस्‍थापित करत होती. नंतर मोबाइलमध्‍ये चित्रिकरण करून संबंधित पुरुषाला ब्‍लॅकमेल करत होती. एवढेच नाही तर ती हे पैसे व्‍याजाने देत होती. यातूनच तिचा खून झाला असावा, असा अंदाज पोलिस व्‍यक्‍त करत आहेत. सुनीता राठौड (35) असे तिचे नाव आहे.

दोन वर्षांपूर्वी पतीने सोडले..
> हरियाखेडा येथील प्राथमिक शाळेत ती कंत्राटी शिक्षिका म्‍हणून कार्यरत होती.
> राजमल राठौर यांच्‍या घरात ती किरायाने राहत होती.
> तिने राजमल राठौड यांना दोन वर्षांपूर्वी 1 लाख 70 हजार रुपये व्‍याजाने दिले होते.
> त्‍या बद्दल्‍यात ती त्‍यांच्‍याकडून दर महिन्‍याला 2 हजार रुपये घेत होती.
> शिवाय किरायासुद्धा देत नव्‍हती.
> तिच्‍याकडे रोज वेगवेगळे अनोळखी पुरुष येत असल्‍याची माहिती घरमालक राठौड यांनी दिली.
पूर्ण घरातील सामान अस्‍ताव्‍यस्‍त फेकले
> ज्‍या व्‍यक्‍तीने शिक्षिकेचा खून केला केला त्‍या व्‍यक्‍तीने तिच्‍या घरातील सर्व सामान अस्‍ताव्‍यस्‍त फेकून दिले.
> मात्र, घरातील पैसे किंवा मौल्‍यवान वस्‍तू चोरून नेल्‍या नाहीत.
> त्‍यामुळे ती व्‍यक्‍ती काही तरी शोधत असावी आणि त्‍यासाठीच तिने खून केला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्‍यक्‍त केला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)