आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Mathura हिंसाचार : 'रामवृक्ष'च्‍या बागेत आढळले US बनावटीचे रॉकेट लॉन्चर, गुन्‍हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मथुरा (उत्‍तर प्रदेश) - येथील जवाहर बागेत झालेल्‍या हिंसाचारानंतर बॉम्‍ब डिस्‍पोजल स्‍क्‍वॉडला (बीडीएस) अमेरिकन बनावटीचे रॉकेट लॉन्चर सापडले. त्‍यावर JEFFERSONOH 1044047 हा क्रमांक लिहिलेला असून, या प्रकरणी दाखल गुन्‍ह्यात याचा उल्‍लेख करण्‍यात आला.
आतापर्यंत काय - काय सापडले
> 2 जून रोजी मथुरा येथे जवाहर बाग येथे अतिक्रमणविरोधी मोहीम राबवताना पोलिस आणि आंदोलकांदरम्यान संघर्ष झाला होता.
> यात एका पोलिस अधिकाऱ्यांसह 29 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.
> त्‍या नंतर पोलिसांनी राबवलेल्‍या शोध मोहिमेत या ठिकाणी बीडीएस आणि फॉरेंसिक पथकाला 2.5 kg गन पाउडर, 5 kg सल्फर, 1 kg पोटास, 1 इलेक्‍ट्रॉनिक प्‍लेट आणि 0.5 kg लोखंडाचे छर्रे सापडले.
> पोलिसांना मंगळवारी या ठिकाणी अमेरिकन बनावटीचे एक रॉकेट लॉन्‍चरसुद्धा सापडले.
> मथुरा बीडीएस प्रभारी रामपाल सिंह यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.
> या प्रकरणाचा तपास करत असलेले उपनिरीक्षक नंदलाल सिंह म्‍हणाले, रामवृक्ष यादव याच्‍याकडे हे रॉकेट कसे आले आणि त्‍याला या रॉकेटसह इतर शस्‍त्रे कुणी दिली, याचा तपास सुरू आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...