आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनीमूनहूून आलेला नवरदेव दोनच दिवसांंत झाला 42 वर्षीय प्रेयसीसोबत रफूचक्कर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- नवविवाहीत पत्नीसोबत मॉरीशसहून हनीमून करून आलेला 24 वर्षीय तरुण त्याच्या 42 वर्षीय प्रेयसीसोबत पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना जबलपूरमधील आहे. या घटनेने एक नव्हे, दोन नव्हे तर तीन कुटुंबे हैराण झाली आहेत. तिन्ही कुटुंबातील सदस्य दोघांचा शोध घेत आहेत.

जबलपूरमधील गोरखपूर दत्त अपार्टमेंटमध्ये राहाणारे निर्मित जैन यांचा विवाह फेब्रुवारी महिन्यात झाला. नवविवाहीत पत्नीसोबत निर्मित हनीमूनसाठी मॉरीशसला गेला होता. 29 मे रोजी तो जबलपूरला परतला. दोन दिवसांनी 31 मे रोजी निर्मित 42 वर्षीय प्रेमिका हीर शिवदासानी हिच्यासोबत रफूचक्कर झाला. दोघांच्या कुटुंबियांनी गोरखपूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली केली आहे. दुसरीकडे निर्मितच्या सासरची मंडळी देखील जावईचा शोध घेत आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिल्लीतील सर्व देशांच्या दूतावासांना निर्मित व हीरचे फोटो पाठवले आहेत. निर्मित व हीरचे मोबाइल बंद आहेत. त्यामुळे त्यांचे लोकेशन ट्रेस करण्यात अनेक अडचणी येत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे

पुढील स्लाइडवर वाचा, निर्मित व हीरचे दोन वर्षांपासून सुरु होते गुटूरगू...
बातम्या आणखी आहेत...