आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Married Lovers Committed Suicide In River In Madhya Pradesh

PHOTO: ओढणीने एकमेकांना बांधून मॅरीड प्रेमीयुगुलाने नदीत मारली उडी, मृत्यूनंतरही सोबत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश)- येथील एका प्रेमीयुगुलाने नदीत उडी मारुन आत्महत्या केली. यावेळी दोघांनी एकमेकांना तरुणीच्या ओढणीने बांधून नदीत उडी मारली. त्यामुळे मृत्यूनंतरही दोघांचे मृतदेह अगदी सोबत आढळून आले. दोघांच्या मृत्यूवर परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.
पाणबुड्यांनी दोघांचे मृतदेह काढले तेव्हा दोघेही एकमेकांना अगदी जोडून होते. या दोघांची नावे योगेश भावसार आणि वर्षा चौधरी आहे. दोघांचे लग्न झाले आहे. योगेशला एक मुलगा आणि वर्षाला एक मुलगा व मुलगी आहे. पण गेल्या काही दिवसांपासून दोघे एकमेकांसोबत राहत होते. दोघांना आधीच्या जोडीदाराला घटस्फोट देऊन लग्न करायचे होते.
नदीच्या शेजारी मिळाली बाईक, बुट, चप्पल, पर्स
रविवारी दोघे या नदीच्या किनारी आले. त्यांनी बुट, चप्पल आणि पर्स नदीच्या किनाऱ्यावर काढून ठेवले. त्यानंतर नदीत उडी मारली. बाईकच्या शेजारीत त्यांनी मोबाईल आणि पर्स रुमालाने बांधून ठेवले होते. कुटुंबीयांना फसवण्यासाठी दोघे पळून गेले असावेत असा संशय पोलिसांना प्रथम आला होता. त्यानंतर पाणबुड्यांच्या मदतीने दोघांचे मृतदेह शोधण्यात आले. अखेर दोघांचे मृतदेह नदीत सापडले.
पुढील स्लाईडवर बघा, आणखी फोटो...