धार- मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात असलेल्या डही गावात विद्येच्या मंदिरातच एका मौलानाने
विवाहितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे तर व्हिडिओ बनवून पीडितेला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे पीडितेचा पती हा आरोपी मौलानाचा मित्र असून तो त्याला या कामात मदत करत होता.
आरोपी मौलाना आणि पतीच्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून अखेर पीडितेने तिच्या माहेरच्या लोकांना
आपबिती सांगितली. नंतर पीडितेने आरोपी मौलाना आणि पती विरोधात तक्रार दाखल केली.
पीडितेच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन एसपी बीएस चौहान यांनी डही मदरशाच्या मौलाना नोमान अयाज (रा.दाहोद) याला अटक केली आहे. पीडितेचा पती फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
आरोपी मौलाना नोमाज अयाज हा पीडितेवर गेल्या ऑगस्ट महिन्यापासून लैंगिक छळ करत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. पीडितेचा पती वाहन चालक आहे. तो खुडेल येथील रहिवासी असून तो पीडितेसोबत डही येथे भाड्याच्या खोलीत राहात होता. पीडितेचे माहेर सेंधवा येथील आहे.