आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MBBS च्‍या विद्यार्थिनीची आत्‍महत्‍या, FB वर लिहीले,'आपण कधीच मोठे झालो नसतो तर'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुस्कान अग्रवाल - Divya Marathi
मुस्कान अग्रवाल
भोपाळ - पीपुल्स मेडिकल कॉलेजच्‍या गर्ल्‍स हॉस्‍टेलमध्‍ये एका एमबीबीएसच्‍या विद्यार्थिनीचा सोमवारी संशयास्‍पद मृत्‍यू झाला. सकाळी ही विद्यार्थिनीची बेशुद्ध अवस्‍थेत होती व तिच्‍या कानात हेडफोन होते, अशी माहिती तिच्‍या मैत्रिणीने दिली. घटनास्‍थळी दाखल झालेल्‍या निशातपुरा पोलिसांना खोलीत एक डायरी दिसली. काय आहे पूर्ण प्रकरण....
- खातेगांव येथील 20 वर्षीय मुस्कान अग्रवाल कॉलेजच्‍या गर्ल्स हॉस्टेलमध्‍ये राहत होती.
- मुस्‍कासोबत तिची मैत्रीण श्रेया श्रीवास्तव ही देखिल राहत होती.
-मुस्‍कानचे वडिल उत्तम अग्रवाल यांचे खातेगांवमध्‍ये पाईप व टाइल्स विक्रीचे दुकान आहे.
- टीआय संजय बैस यांच्‍या मतानुसार, रात्री 11 वाजता मुस्कान आणि श्रेया झोपल्‍या होत्‍या.
- सोमवारी सकाळी आठ वाजता श्रेयाला जाग आली. तेव्‍हा मुस्‍कानच्‍या अंगावर चादर होती.
- श्रेया वॉशरूममधून आली, तरी मुस्कान उठलीच नाही.
- श्रेयाने चादर काढली तर, मुस्‍कानने हेडफोन लावले होते. तिच्‍या तोंडातून फेस येत होता.
- श्रेयाने हॉस्‍टेल वॉर्डन आणि इतर मुलींना या बाबीची कल्‍पना दिली.
- मुस्‍कानला हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले. तेव्‍हा डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले.
- घटनास्‍थळी दाखल झालेल्‍या पोलिसांनी मुस्‍कानचा मृतदेव पीएमसाठी पाठवला.
- विष प्राशनाने श्रेयाचा मृत्‍यू झाला असा संशय पोलिसांनी व्‍यक्‍त केला.
मला माहिती आहे तुम्‍हाला मोठा त्रास होतोय....
एसपी नॉर्थ अरविंद सक्सेना यांच्‍या मतानुसार, मुस्कानच्‍या रुममध्‍ये एक डायरी मिळाली. त्‍यामध्‍ये तिने लिहीले होते. बाबा मला शिक्षणाव्‍यतीरिक्‍त आणखी काही करायचे आहे. पण तुम्‍हाला सांगायची हिंम्‍मत होत नाही. मी खूप दुखी आहे. तुम्‍हाला वाटते की मी शिकावे. तुम्‍ही माझ्यावर खूप प्रेम करता. तुम्‍ही मोठा त्रास सहन करून मला शिकवता याचीही जाणीव आहे.
पालक मेळाव्‍यासाठी वडिलांना केला होता फोन....
मुस्कानचे काका शेखर अग्रवाल यांनी सांगितले, सोमवारी कॉलेजमध्‍ये पॅरेंट्स मीट होणार होती. त्‍यासाठी मुस्‍कानने रविवारी सायंकाळी तिच्‍या बाबाला फोन केला होता. ते म्‍हणाले आज बाजाराचा दिवस असल्‍याने येणे जमणार नाही. त्‍यावर हरकत नसल्‍याचे ती म्‍हणाली.

फेसबुकवर आजीसोबतचा फोटो शेयर केला होता....
मुस्कानच्‍या आजी कमला अग्रवाल भाजपाच्‍या वरिष्‍ठ नेत्‍या आहेत; 1993 मध्‍ये त्‍या खातेगांव विधानसभा सीटवर थोड्या फरकाने हरल्‍या होत्‍या. मुस्कानच्‍या लहान भावाचे नाव विशाल आहे. तो सध्‍या कोटामध्‍ये आयआयटीचे शिक्षण घेत आहे. मुस्कानची आर्इ मोनिका गृहिणी आहे.
जर आपण कधीच मोठे झालो नसतो....
- फेसबुकवर मुस्‍कानने आजी आणि आजोबाचे फोटो सर्वात सुंदर असल्‍याचे म्‍हटले आहे.
- दादी कमलासोबत तिचा आणि लहान भाऊ विशाल यांचे फोटो आहेत.
- तिने ऑक्‍टोबर 2014 मध्‍ये हा फोटो शेयर केला आहे. तिने लिहीले की- कोणती चिंता नाही, काळजी नाही... केवळ प्रेमाची भावना. जर विशू आपण कधी मोठेच झालो नसतो तर.... तिने स्‍व:त तयार केलेला गणपतीचा एक फोटोही पोस्‍ट केला होता.
गरीबांवर उपचार करणे होते तिचे स्‍वप्‍न.....
शेखर यांनी सांगितले, दस-याला खातेगांवच्‍या यात्रेत 8 मेडिकल विद्यार्थी-विद्यार्थिनींना सम्‍नानित करण्‍यात आले. त्‍यामध्‍ये मुस्‍कानही होती. त्‍यानंतर भास्‍करला दिलेल्‍या मुलाखतीत मुस्‍कान म्‍हणाली होती की, डॉक्टरांचा ग्रामीण भागात नोकरीला नकार असतो; पण मी असे करणार नाही. खातेगांव आणि परिसरातील गावांमध्‍ये जाऊन मी गरीबांवर उपचार करेल.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, मुस्‍कानचे फोटो....