आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेडिकल आणि इंजिनिअरिंगची पुस्तके हिंदीमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - देशभरात वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण आतापर्यंत इंग्रजीमधून होत आले आहे. मात्र, आता ते हिंदीमध्येही उपलब्ध होईल. अटलबिहारी वाजपेयी हिंदी विद्यापीठ अभियांत्रिकी व वैद्यकीय विषयांची पुस्तके हिंदीत आणत आहे. अन्य भाषांमधून भाषांतर केले जात आहे. येत्या सत्रापासून अभियांत्रिकी हिंदीमध्ये शिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमावर काम केले जाईल. तांत्रिक शब्दावर मुख्यत: भर दिला जात असल्याचे कुलगुरू प्रो. एम. एल. छिपा यांनी सांगितले. या प्रोजेक्टमध्ये मौलाना आझाद राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेची (मॅनिट) मदत घेतली जात आहे. हिंदी पुस्तकांमध्ये कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगवर भर दिला जाईल.