आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नेहसभा: असंख्य चांगल्या आठवणींच्या ठेव्यामुळे कायम स्मरणात राहतील रमेशजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळच्या मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये स्नेहसभा झाली. या वेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित लोकांनी रमेशजींना पुष्पांजली अर्पण केली. - Divya Marathi
भोपाळच्या मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये स्नेहसभा झाली. या वेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित लोकांनी रमेशजींना पुष्पांजली अर्पण केली.
भोपाळ- दैनिक भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांच्या स्मरणार्थ  शनिवारी शहरातील लाल परेड मैदानावरील मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये स्नेहसभेचे आयोजन करण्यात आले होते. दूरदूरच्या भागातून आलेल्या रमेशजींच्या हजारो परिचितांनी  त्यांना पुष्पांजली अर्पण केली. तासभर चाललेल्या या सभेत भक्तिगीते सादर करण्यात आली.  रमेशजींच्या आठवणी या वेळी ताज्या झाल्या.

या सभेच्या समारोपप्रसंगी पंडित विजयशंकर मेहता यांनी म्हटले...
दशरथ, भीष्म, श्रीकृष्ण आणि परीक्षित राजा  या  चौघांचे मृत्यू शास्त्रांत चर्चेत राहिले. रमेशजींनीसुद्धा  ज्याप्रकारे या जगाचा निरोप घेतला ते अद््भुत  आहे. त्यांनी संपूर्ण रामकथा एेकल्यानंतर देवलोकी गमन करण्याची जशी स्वत: तयारी केली होती. समाजातील प्रत्येक घटकाशी त्यांचे निकटचे संबंध होते. यामुळेच प्रत्येकाला  स्नेहपूर्वक स्मरण  होते. अशा व्यक्तीचे निधन परीक्षित राजाप्रमाणे एक स्मरणीय प्रसंग ठरतो. लखनऊहून आलेल्या गायकांनी लोकप्रिय भक्तिगीते गायली. 

शेवटी रमेशजींचे आवडते “ना हम तुम्हे जानें, ना तुम हमें जानो | ’सर्वांनी ऐकले, असे मेहता यांनी सांगितले. सभेत आर्च बिशप  डॉ. लियो कार्नेलियो, हरियाणाचे राज्यपाल कप्तानसिंह सोळंकी, अभिनेता आशुतोष राणा, ज्येष्ठ पत्रकार महेश श्रीवास्तव, मंत्री विश्वास सारंग, रघुनंदन शर्मा, रामेश्वर शर्मा, राजकुमार पटेल यांच्यासह माध्यमे, राजकीय, व्यावसायिक, सामाजिक व सांस्कृतिक संघटनांचे प्रतिनिधी आदींनी रमेशजींच्या छायाचित्रास पुष्पांजली वाहिली.
बातम्या आणखी आहेत...