आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2017 पासून देशातील विद्यापीठात सुरू होतील मिनी आयआयटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- देवी अहिल्या विद्यापीठासह राज्यातील अन्य विद्यापीठांत मिनी आयआयटी २०१७ पासून सुरू होतील. प्रयत्न तर असे आहेत की, याच वर्षी हे आयआयटी सुरू व्हावेत.

यावर्षा अखेरीस इंदूरपासून याची सुरुवात केली जाईल. यासाठी विद्यापीठाच्या तक्षशिला या परिसरात जागेचा शोध सुरू आहे. राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उमाशंकर गुप्ता याविषयी लवकरच एक बैठक बोलावणार आहेत. यास स्वत: प्रमुख सचिव आणि आयुक्त उच्च शिक्षण या प्रकल्पासाठी जातीने लक्ष घालत आहेत. यात विशेष बाब ही आहे की, यास संपूर्णपणे आयआयटीच्याच धर्तीवर बनवले जाईल. पण याचे स्वरूप मात्र छोटे (मिनी) असेल. राज्य शासन या प्रकरणी प्रस्ताव पारित करून चुकले आहे. बीटेक-एमटेक आणि बीईसारखे तांत्रिक कोर्सला बढावा देण्यासाठी हे मिनी आयआयटी उघडत आहेत. यात आत्याधुनिक संशोधनालादेखील महत्त्व दिले जाईल.
वैशिष्ट्ये आयआयटीमध्ये :
> बीई, बी-टेक, एमटेकसारखे कोर्स सुरू होतील. संशोधनासाठी आधुनिक प्रयोगशाळा तयार केली जाणार.
> प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा वा गुणवत्तेच्या आधारावरच दाखला मिळेल.
> ई-ग्रंथालय, आधुनिक इमारत आणि ई-क्लासरूम तयार होतील.