आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: कृषिमंत्र्यांच्या मद्यपी जावयाचा धिंगाणा; महिला प्रवाशांनी केली चपलांनी धुलाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाल/नागपूर- मध्य प्रदेशचे कृषिमंत्री गौरीशंकर बिसेन यांचे जावई डॉ. चंद्रशेखर पारधी यांनी गुरुवारी मध्यरात्री छत्तीसगड एक्स्प्रेसमध्ये दारू पिऊन धिंगाणा घातल्याचे उघड झाले आहे. नशेत तर्रर्र डॉ.पारधी यांना महिला प्रवाशांनी चांगलाच चोप दिला. मात्र पारधी हे खरोखरच कृषिमंत्र्यांचे जावई असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रकरण दाबण्यात येत असल्याची चर्चा आहे.

डॉ. चंद्रशेखर पारधी हे हबीबगंज स्थानकावरून गोंदियाला जाण्यासाठी छत्तीसगड एक्स्प्रेसमध्ये चढले. ते ए-१ कोचमधून प्रवास करीत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दारूच्या नशेत असलेले डॉ.पारधी वारंवार आपण मध्य प्रदेशच्या कृषिमंत्र्यांचे जावई असल्याचे सांगत होते. रात्रभर रेल्वेत गोंधळ घालून त्यांनी धिंगाणा केला. यामुळे कोचमधील सहप्रवासी चांगलेच त्रस्त झाले. जवळपास चार तास गोंधळ सहन केल्यानंतर प्रवाशांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र नशेत असलेले पारधी वारंवार कृषिमंत्र्यांचे नाव सांगून धमकी देत होते. अखेर सहनशक्तीचा अंत झाल्यानंतर काही महिला प्रवाशांनी त्यांची चपलांनी धुलाई केली. नंतर ‘जीआरपी’ नागपूर पोलिसांना सूचना दिली. त्यानंतर पोलिसांनी रात्री 3.15 वाजेच्या सुमारास पारधी यांना नागपूर स्थानकावर उतरवून घेत ताब्यात घेतले. त्यानंतर ते मध्य प्रदेशच्या कृषिमंत्र्यांचे जावई असल्याचे स्पष्ट झाले.

पुढील स्लाइडवर... काय  म्हणाले कृषिमंत्री आणि गोंधळी जावईचा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...