आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला मंत्र्याने मुलाला लाथेने ठोकरले, काँग्रेस म्हणाली - भाजपला सत्तेची नशा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ (मध्यप्रदेश) - मूडीज सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेने भारतीय जनता पक्षाचे मंत्री आणि नेत्यांचे वर्तन सुधारले नाही तर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला त्याचा फटका सहन करावा लागेल असा इशारा दिल्यानंतरही भाजप शासित राज्यातील मंत्र्यांच्या वागण्या-बोलण्यात कोणताही फरक पडलेला नाही. मध्यप्रदेशच्या पशुसंवर्धन खात्याच्या मंत्री कुसुम मेहंदळे यांनी रविवारी एक रुपया भिक मागणाऱ्या मुलाला लाथडण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे रविवारी राज्याचा स्थापना दिवस होता आणि त्याच दिवशी महिला मंत्र्यांचे हे असंवेदनशिल कृत्य समोर आले होते. त्यानंतर सोमवारी या घटनेवर विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेते म्हणाले, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानांचे सरकार आणि मंत्री सत्तेच्या नशेत आहेत. त्यांनी कुसुम मेहंदळेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. युवक काँग्रेसने या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढला.
मुलगा मागत होता फक्त एक रुपया
कुसुम मेहंदळे पन्ना येथे स्वच्छता अभियानात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपून त्या कारकडे येत असताना एक मुलगा त्यांच्या मार्गात आला आणि पायांवर पडत एक रुपयासाठी गयावया करु लगाला. लहान मुलाची ही छोटीशी विनंती ऐकून मंत्री महोदयांच्या ह्रदयाला पाझर फूटला नाही, उलट त्यांनी मुलाला लाथ मारली आणि पुढे निघाल्या. एवढेच नाही तर मंत्री कुसुम यांच्या सेक्यूरिटी गार्ड्सनी मुलाला उचलून बाजूला फेकले.
कुसुम मेहंदळे वादग्रस्त मंत्री
पन्ना विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या कुसुम मेहंदळे यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्य केले होते. शेतकरी आत्महत्येवर त्या म्हणाल्या होत्या, शेतकरी मुलाच्या मृत्यूनंतर आत्महत्या करत नाहीत, मग पीकाचे नुकसान झाल्यानंतरही करु नये. कुसुम यांच्याकडे पशुसंवर्धन खाते आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित घटनेचे फोटो
बातम्या आणखी आहेत...