आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामूहिक बलात्कार करून जिवंत जाळले, मध्य प्रदेशातील खळबळजनक घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहडोल - मध्य प्रदेशातील अनूपपूर जिल्ह्यातील तुम्मी गावात एका अल्पवयीन मुलीचे दोन तरुणांनी अपहरण केले. तिला जंगलात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या कृत्यानंतर वाच्यता होऊ नये म्हणून तिच्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पीडितेला शहडोल जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.   

पोलिसांना तिने दिलेल्या जबानीत सांगितले की, १४  फेब्रुवारी रोजी रात्री ती घरात एकटी होती. तेव्हा मोटारसायकलवरून जुगवारी बंधवा येथील राहणारे अजय व अक्षय नावाचे दोन तरुण घरी आले. मला जबरदस्तीने बाइकवर बसवून जंगलात नेले. तेथे जबरदस्तीने गुंगीचे औषध दिले. मी बेशुद्ध पडल्यानंतर कुकर्म केले. या घटनेची कोठेही वाच्यता होऊ नये म्हणून बाइकमधून पेट्रोल काढले व पेटवले.  त्यानंतर हे दोघे तरुण पळून गेले. या मुलीचा पाठीचा काही भाग व पाय जळाला आहे. ती मुलगी रात्रभर त्या जंगलातच पडून होती. सकाळी काही लोकांनी तशा अवस्थेत त्या मुलीला पाहिले. त्यांनी १०८ वाहनाने रुग्णालयात पाठवले. यासंदर्भात पोलिस महानिरीक्षक सुधीर लाड यांनी सांगितले. शहडोलचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक  शिवकुमार शर्मा यांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...