आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतणी म्हणाली, पोटात दुखतंय; आत्याने पोट पाहताच समोर आले हे सत्य!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जाताना पोलिस... - Divya Marathi
पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जाताना पोलिस...
इंदूर - खरगोन येथे एका अवघ्या 12 वर्षीय मुलीच्या पोटात साडे पाच महिन्यांचा गर्भ असल्याचे उघडकीस आले आहे. तिची ही अवस्था तिच्याच काकाच्या मुलाने केली. आरोपी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. पीडित आणि तिच्या कुटुंबियांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानंतर पीडितेचे कुटुंबीय मुलीच्या गर्भपातासाठी अडून बसले आहेत. डॉक्टरांनी मात्र, गर्भपात केल्यास पीडितेच्या जिवाला धोका असल्याचे स्पष्ट केले आहे.
 

जिवे मारण्याची धमकी
एएसपी अंतरसिंह कनेश यांनी संपूर्ण प्रकरण सविस्तरपणे सांगितले. 12 वर्षांच्या मुलीने केलेल्या तक्रारीप्रमाणे, ती 6 महिन्यांपूर्वी घराच्या पाठीमागे असलेल्या आरोपी लखन सिंह जमरे (19) च्या किराणा दुकानावर खरेदीसाठी गेली होती. तेव्हा लखनने तिला आतमध्ये हिसकावून दार बंद केला. बलात्कार केल्यानंतर हा प्रसंग कुणालाही सांगितल्यास जिवे मारणार अशी धमकी त्याने पीडितेला दिली. यावर प्रचंड घाबरलेल्या पीडितेने कुणाला काहीच सांगितले नव्हते.
 

आत्याला सांगताना घाबरत होती
तिच्या याच भितीचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. काही दिवसांपूर्वीच ती आपल्या आत्याच्या घरी गेली होती. त्याचवेळी तिने आपल्या आत्याला पोटात खूप दुखत असल्याचे सांगितले. आत्याने जेव्हा पोट बघितला तेव्हा, ते फुगलेले होते. आत्याने तिला वारंवार विचारूनही ती काहीच सांगत नव्हती. तिला पूर्णपणे विश्वासात घेऊन भिती दूर केल्यानंतरच तिने सत्य काय ते सांगितले. यानंतर आत्याने आपल्या भावाला हा प्रकार सांगून पोलिस ठाणे गाठले. आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या लखन विरोधात तक्रार दाखल केली. सध्या तो फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. 
 
 
पोलिसांनी दिले पैश्यांचे अमीष
- पीडितेच्या कुटुंबियांनी लावलेल्या आरोपानुसार, ते तक्रार दाखल करण्यासाठी जेव्हा पोलिस स्टेशनला पोहोचले तेव्हा पोलिसांनी सर्व प्रकार ऐकूणही गुन्हा दाखल केला नाही. उलट, आरोपीच्या कुटुंबियांना ठाण्यात बोलावले आणि समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पीडितेच्या कुटुंबियांनी कुठल्याही प्रकारची तडजोड करण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर पीडितेच्या पित्याला पोलिस जीपमध्ये बसवून गावात आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. 
- यानंतरही पोलिसांनी ठाण्यात बसलेल्या कुटुंबियांची तक्रार दाखल केली नाही. किती पैसा घेता सांगा आणि समेट करून घ्या असे कथितरीत्या पोलिसांनी म्हटले होते. तरीही काही एक ऐकण्यास नकार देणाऱ्या कुटुंबियांनी पोलिसांना आपला प्रस्ताव लेखी स्वरुपात देण्याची मागणी केली. अखेर 13 तासानंतर पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. 
 
  
गर्भपात केल्यास जीविताला धोका
वैद्यकीय चाचणीला घेऊन गेलेल्या कुटुंबियांनी मुलीच्या गर्भपाताचा आग्रह धरला. मात्र, डॉक्टरांनी त्यास नकार दिला. डॉक्टरांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता गर्भपात केल्यास तिच्या जीविताला धोका असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे, डॉक्टरांचे पथक पालकांचे ऐकण्यास नकार देत आहेत. 
 
  
20 आठवड्यांच्या आतच गर्भापातीच परवानगी
मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेगनेंसी अॅक्ट अंतर्गत 20 आठवड्यांच्या आत गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. भ्रूण अनुवांशिकरीत्या असामान्य असल्यास क्वचित प्रसंगीच कोर्ट गर्भपाताला परवानगी देऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...