आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीला सोडून शेजाऱ्याशी केले लग्न, ऑटोतून परत येताना नातेवाइकांनी घेरून अशी केली मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर - शिवपुरीमध्ये नॅशनल हायवेवर प्रियकरासह लग्न करून ऑटोरिक्षाने परतणाऱ्या महिलेला तिच्या पहिल्या पतीच्या नातेवाइकांनी बेदम मारहाण केली. त्यांनी महिलेला ऑटोरिक्षामधून ओढून खाली उतरवले आणि नव्या पतीला तेथेच मारहाण सुरू केली. तब्बल अर्धा तास दोघांना मारहाण होत राहिली, नंतर पोलिस आले आणि सर्वांना पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेले.
 
असे आहे प्रकरण...
- शिवपुरीच्या कमलागंज परिसरात राहणारी विवाहित गुड्डी आपल्या पतीला सोडून शेजारी मोहन सिंह याच्यासह पळून गेली होती. दोघांनी सोमवारी कोर्टात लग्न केले. तेव्हापासून गुड्डीच्या सासरचे तिचा शोध घेत होते.
- गुड्डी गुरुवारी नवा पती मोहन सिंहसोबत ऑटो रिक्षामध्ये शिवपुरीला जात होती. ऑटोरिक्षा आग्रा-मुंबई नॅशनल हायवेवरून जाताना पहिल्या पतीच्या नातेवाइकांनी त्यांचा रस्ता अडवला.
- दोघांना रिक्षातून ओढून मारहाण सुरू केली. नातेवाइकांनी गुड्डीच्या नव्या पतीला बेदम मारहाण केली. नातेवाइकांसह गर्दीनेही त्यांच्यावर या वेळी हात साफ केला. दोघेही हात जोडून म्हणत होते की, आम्ही कोर्टात लग्न केलेय.
- हायवेच्या मधोमध हंगामा होत असल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस पोहोचले आणि नातेवाइक, मोहन सिंह व गुड्डीला पोलिस स्टेशनमध्ये आणले. पोलिसांसमोर गुड्डी म्हणाली की, तिने मर्जीने प्रियकराशी कोर्टात लग्न केले आहे. यावर पोलिसांनी नातेवाइकांची समजूत घालून त्यांना शांत केले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, रिक्षातून प्रेमीयुगुलाला खेचून नातेवाइकांनी मारहाण केलेले फोटोज...
बातम्या आणखी आहेत...