आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi, Advani Come Together On Forum, 5 Lack People Gather

मोदी, अडवाणी आज एकाच व्यासपीठावर; पाच लाखांवर कार्यकर्त्यांची गर्दी उसळणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या घोषणेला विरोध करणारे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी या मतभेदानंतर मोदींसोबत बुधवारी पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येत आहेत. मध्य प्रदेश भाजपच्या वतीने होणार्‍या या सभेला सुमारे पाच लाखांवर कार्यकर्त्यांची गर्दी होण्याची अपेक्षा आहे. या महामेळाव्यासाठी पक्षाध्यक्ष राजनाथसिंह, मोदी, अडवाणी आज एकत्र माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित राहतील. दुपारी 1 वाजता मोदी सभास्थानी येतील. नोव्हेंबरमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. एखाद्या राजकीय पक्षाने ठेवलेला हा जगातील सर्वात भव्य मेळावा ठरेल, असा दावा पक्षाचे नेते व खासदार अनिल दवे यांनी केला.


शिवराजसिंहांचा पुढाकार : छत्तीसगडच्या दौर्‍यात अडवाणी यांनी मोदींच्या कामगिरीचे कौतुक केले होते. त्यानंतर होणार्‍या मोदींच्या या सभेला येण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीच अडवाणी यांना गळ घातल्याचे समजते. चौहान त्यांचे निकटवर्तीय मानले जातात.