भोपाळ/दमोह (मध्य प्रदेश)- जबेरा येथील दुर्गावती वन अभयारण्यात वाहनाची धडक बसल्याने एक वानर जबर जखमी झाला. त्याच्या मदतीला एक शिक्षक धावून गेला. त्याने वन विभागाला याची माहिती दिली. तोवर शक्यतेवढी वानराला मदत केली. पण वन विभागाने गांभीर्य दाखवले नाही. वानराला नेल्यानंतर केवळ 8 तासांत त्याचा मृत्यू झाला.
दानीताल आणि सतघटिया यांच्या दरम्यान 21 सप्टेंबर रोजी दमोह-जबलपूर हायवेवर वानराला एका भरधाव वाहनाची धडक बसली. यात तो गंभीर जखमी झाला. बराच काळ तो रस्त्यावर पडून होता. राजेश जैन नावाचे शिक्षक या रस्त्यावरुन जात होते. त्यांना वानराची दया आली. त्यांनी आपली बनियान काढून वानराच्या जखमांवर बांधली. या घटनेची माहिती वन विभागाला दिली. पण वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटना गांभीर्याने घेतली नाही. घटना घडल्यानंतर सुमारे 8 तास वानरावर उपचार करण्यात आले नाहीत.
वानराचा अपघात झाल्याच्या घटनेत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची प्रचंड निष्काळजी दिसून आली. त्यांनी वानरावर उपचारच केले नाही. उलट त्याचा मृत्यू झाल्यावर वन विभागाचे चिकित्सक डॉ. के. एस. सोनी यांच्याकडे पोस्टमॉर्टमसाठी नेले. पण वानरावर उपचार केल्याचा दावा मात्र केलाय. यासंदर्भात विचारणा केली असता सोनी यांनी सांगितले, की वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत वानर माझ्याकडे आणले होते.
अधिकारीही बोलले खोटे
गिरीदर्शन अभयारण्याचे इंचार्ज डेप्युटी रेंजर एच. के. महोबिया यांनी सांगितले, की घायल वानरावर डॉ. मनोज श्रीवास्तव यांनी उपचार केले. त्यानंतर वानराचा मृत्यू झाला. पण श्रीवास्तव यांच्याशी बोलल्यावर त्यांनी याचा साफ शब्दांत इन्कार केला.
शिक्षक म्हणाले, धमकी दिली जात आहे
यासंदर्भात राजेश जैन यांनी वनविभागाला माहिती विचारली. तेव्हा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांनाच दमदाटी केली. या प्रकरणी जास्त हुशारी दाखवू नका. नाही तर तुम्हालाच वानराच्या मृत्यूप्रकरणी आत टाकू. मग राहाल आत, असे बजावले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, राजेश जैन यांनी वानराला अशी केली मदत... असा गंभीर जखमी झाला होता वानर....