आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्‍या पावसाची सर, अबालवृध्‍दांमध्‍ये मस्‍तीची लहर.! बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ -खूप दिवसांच्‍या प्रतिक्षेनंतर पावसाने हजेरी लावली आणि लहानापासूंन थोरांपर्यंत सर्वांना आनंदाचे भरते आले. अबालवृध्‍दांनी घराबाहेर पडत पावसात मनसोक्‍त भिजण्‍याचा आनंद लुटला. कुणी गाडीवर फिरायला निघाले तर, कुणी पाण्‍यात चिंब भिजून पावसाचे स्‍वागत केले.

32 वर्षांनतर प्रथच एवढ्या उशिरा पाऊसाचे आगमन
32 वर्षांनंतर प्रथमच एवढ्या उशिरा पावसाने हजेरी लावली आहे. 1982 मध्‍ये पावसाने 12 जूलै रोजी आपले आगमन केले होते. दिल्‍लीमध्‍ये सुध्‍दा 1.5 सेमी पाऊस झाला.
हवामान खात्‍याचे केंद्र निर्देशक डॉ. ए.काश्‍यपी यांनी दिलेल्‍या माहितीनुसार बिहार, झारखंड आणि मध्‍यप्रदेशमध्‍ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्‍याचा प्रभाव मध्‍यप्रदेशमध्‍येही असणार आहे. त्‍यामुळे हलका पाऊस पडणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. अरबी समुद्र आणि बंगालच्‍या खाडीवर ढग तयार झाले असून पुढील आठवड्यात चांगल्‍या पावसाची शक्‍यता वर्तविली आहे.
(फोटोओळ- पावसात चिंब भिजताना युगल)
पुढील स्‍लाइडवर पाहा, पावसाचा आनंद घेताना टिपलेली छायाचित्रे..