आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरासरीपेक्षा 6 % कमी पावसाने खरीप पिकांचे गणित बिघडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ/ चंदिगड/रांची/ पाटणा - हवामान खात्याने आधी व्यक्त केलेल्या अंदाजानुसारच आतापर्यंत पाऊस झाला आहे. आजपर्यंत देशात सरासरीपेक्षा टक्के कमी पाऊस झाला आहे. तर झारखंड, हरियाणा, छत्तीसगड अादी राज्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. अर्थात जुलैअखेरीस ऑगस्टच्या सुरुवातीला मान्सून वेग घेऊ शकतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तर भारत, पूर्व तसेच ईशान्य भारतात मान्सून सामान्य किंवा सरासरीपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ही स्थिती आहे. जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यांत पाऊस सरासरीपेक्षा ३२ टक्के कमी झाला आहे. हवामान खात्याने या वर्षी ९२ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

केंद्रसरकारने राज्यांकडे अहवाल मागितला
केंद्रसरकारने दुष्काळाबाबत सर्व राज्यांकडे स्थितिदर्शक अहवाल मागितला आहे. देशभरात कमी पाऊस होण्याचा अंदाज लक्षात घेऊन सरकार परिस्थितीचा आढावा घेत आहे. ग्रामीण विकास मंत्री चौधरी वीरेंद्रसिंह यांनी "दिव्य मराठी नेटवर्क'ला ही माहिती िदली.

बिहार : उत्पादकतेत घट होणार
कृषितज्ज्ञअनिल झा यांनी सांगितले की, १५ जुलैपर्यंत धान पेरणी झाली तरच उत्पादन चांगले होते. पाऊस झाल्याने िचंता वाढली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरा करता येऊ शकतो; पण उत्पादन कमी होईल.
धानाऐवजी मका, बाजरी लावता येईल.

मध्य प्रदेश : दुबार पेरणीचे संकट
माजीकृषी संचालक जी. एस. कौशल यांनी सांगितले की, सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु नंतर पाऊस झाल्याने जमिनीतील ओल कमी झाली आहे. आठ दिवसांत पाऊस झाला नाही तर पिके नष्ट होतील.
पिके कोमेजली आहेत. दुबार पेरणी करावी लागेल.

गुजरात : ३० टक्के पेरणी नाही
उपकृषीनियामक एच. एम. बाबरियांनी सांगितले की, आठवडाभर पाऊस झाला नाही तर पर्यायी उपाययोजना लागू केल्या जातील. बियाणे तयार आहे. आता मूग, उडीद, तूर, एरंडी आदी पिके घेतली जाऊ शकतात. उत्तर गुजरात, कच्छमध्ये पाऊस झाल्याने ३० टक्के पेरणी होऊ शकली नाही.

महाराष्ट्र : सलग चौथा दुष्काळ
मुख्यकृषी सांख्यिकी अधिकारी अनिल बनसोडे यांनी सांगितले की, कृषी िवभागाच्या माहितीनुसार खरिपामध्ये प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, मका आदी पिके घेतली जातात. यंदा पाऊस झाला नाही तर राज्यात सलग चौथ्या वर्षी दुष्काळी परिस्थिती कायम राहील.

देशभरात दीडपट जास्त पेरा
कृषीमंत्रालयाच्या माहितीनुसार देशभरात ५६३ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदाचा पेरा दीडपट जास्त आहे. परंतु पेरणी झाल्याने बहुतांश पिके संकटात आहेत.
लोणी खुर्द (ता. वैजापूर ) येथे पावसाअभावी कपाशीचे पीक सुकून गेले आहेे. लवकर पाऊस झाल्यास पीक हातून जाण्याचा धोका आहेे.

देशातील मान्सूनची स्थिती
६७% भागातसरासरी पाऊस : मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड
२१% भागातकमी पाऊस : मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, गुजरात, सौराष्ट्र, कर्नाटक तसेच रायलसीमा केरळमध्ये.
बातम्या आणखी आहेत...