इंदूर - शहरामध्ये मंगळवारी पावसाने हजेरी लावली अन् तरुणाईला उत्साहाचे भरते आले. महाविद्यालयामधून जथ्थेच्या जथ्थे पावसात भिजायला निघाले. भिजत असलेल्या तरुणींना पाहतांना 'सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपी न्हाल्या ग' या भा.भ.बोरकरांच्या कवितेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
पावसाची एक वेगळीच त-हा असते. कधी कधी मात्र काळ्याकुट्ट ढगांची आकाशात दाटी झालेली असते. आता पडेल की, मग कोसळेल असं वाटत असतानाच हा मात्र चक्क हुलकावणी देत पळून जातो, तर कधी खरोखरीच विजांच्या लखलखाटात अवतीर्ण होतो. अशा पावसात भिजायची काही वेगळीच मजा असते.
फोटोओळ - पावसाचा आनंद घेताना
पुढील स्लाइडवर पाहा, पावसात धम्माल मस्ती करताना युवक युवतींची छायाचित्रे..