आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतामध्ये अविवाहितांपेक्षा विवाहितांच्या आत्महत्यांचे प्रमाण अधिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - भारतामध्ये अविवाहितांपेक्षा विवाहितांचे आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती एका अहवालातून पुढे आली आहे. सन २०१४ मध्ये विवाहितांमध्ये आत्महत्येचे प्रमाण सलग तिसऱ्या वर्षी जास्त आढळून आले आहे.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थेने (एनसीआरबी) ‘अॅक्सिडेंटल डेथस् अॅन्ड सुसाईड्स इन इंडिया’ हा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. सन २०१४ मध्ये एक लाख ३१ हजार ६६६ जणांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.
६५.९ टक्के आत्महत्येचे विवाहितांतील प्रमाण
२१.१ टक्के अविवाहित लोकांमधील प्रमाण
विभक्त कुटुंबांमुळे वाद वाढले, सहनशीलता कमी होत चालली
कुटुंबव्यवस्थेतील बदल मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अभय जैन यांनी सांगितले, भारतीय कुटुंब पद्धतीतील बदल आिण विभक्त कुटुंबांमुळे ताणतणाव वाढत आहेत. यातून सहनशीलताही
कमी होत चालली आहे.