आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीने धरले तिचे पाय, आईनेही समजावले; ती निघून गेली प्रियकरासोबत!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ/रायसेन- देवरीमधील बूधनवाडा गावात एका 38 वर्षीय महिलेने पतीसोबत राहू शकत नसल्याचे कोर्टात सांगितले. या महिलेला पाच आपत्य आहेत. पतीने अक्षरश: तिचे पाय धरले. तो रडलाही. तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले. तिच्या आईनेही तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण, तिने काही एक ऐकले नाही. ती पती आणि पाच मुलांना सोडून 40 वर्षीय प्रियकरासोबत निघून गेली.

अचानक झाली होती बेपत्ता...
देवरीपासून 10 किलोमीटर अंतरावर बूधनवाडा गावातील ही घटना आहे. सरोजबाई (नाव बदलले आहे.) तिच्या पाच मुलांना सोडून घरातून अचानक निघून गेली होती. ती सूखा गावात राहाणार्‍या इंदरसिंहच्या घरी राहात होती. महिलेचा पती हिम्मतसिंह (नाव बदलले आहे.) पचामा गावात मजुरी करतो. 14 नोव्हेंबरला तो घरी आला तेव्हा, त्याला घरात सरोजबाई दिसली नाही. त्याची 9 वर्षीय मुलगी घरात एकटी होती. मुलीकडून त्याला समजले की सरोजबाई दोन दिवसांपासून घरी आलेली नाही.

पोलिसांत नोंदवली तक्रार...
- पतीने त्याच्या नातेवाईकांकडे चौकशी केली. पण ती तिथेही नव्हती. 30 नोव्हेंबरला त्याने देवरी पोलिस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
- पोलिसांनी सरोजबाईचा मोबाईल नंबर ट्रेस केला असता त्याचे लोकेशन सांचीजवळील सूखा गावात दिसले.
- देवरी पोलिस सूखा गावात पोहोचले तेव्हा सरोजबाई, इंदरसिंहच्या घरात सापडली. सोबत चार मुले होते. पोलिस तिला घेऊन देवरीत पोहोचले. 4 डिसेंबरला तिला महिला कोर्टात हजर करण्यात आले.
- पतीसोबत राहायचे नसल्याचे सरोजबाईने कोर्टात सांगितले. कोर्टासमोर तिच्या पतीने तिने पाय धरले. त्याने तिची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचे तिला वचन दिले. तरी देखील तिला दया आली नाही. 5 मुले आणि पतीलासोडून ती 40 वर्षीय प्रियकरासोबत निघून गेली.

1 वर्षापासून इंदरसिंहच्या संपर्कात होती सरोजबाई...
- पोलिसांनी कोर्टात सांगितले की, इंदरसिंह आणि सरोजबाई मागील 1 वर्षापासून संपर्कात होते. रायसेन जाते, असे सांगून ती इंदरसिंहच्या घरी जात- येत होती. इंदरसिंहला दोन मुले आहेत. दोन वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीचे निधन झाले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित बातमीचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...