आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बापाने सोडले, आईने टाकले, काय होईल या गोड चिमुकलीचे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काय होईल अंशिताचे... काय असेल तिचे भविष्य... इन्सेटमध्ये तिची आई मोनिशा. - Divya Marathi
काय होईल अंशिताचे... काय असेल तिचे भविष्य... इन्सेटमध्ये तिची आई मोनिशा.
इंदूर (मध्य प्रदेश)- माय-बापांच्या चुकांची शिक्षा मुलांना भोगावी लागले असे म्हटले जाते. या प्रकरणी हे वाक्य अगदी तंतोतंत लागू होते. आईवडीलांच्या चुकीच्या निर्णयांची, वागणुकीची शिक्षा या मुलीला मिळाली आहे. दोघांच्या संघर्षात ही चिमुकली भरडली गेली आहे. आता तिला ना आई आहे ना बाबा... कोण तिची देखभाल करणार... कोण तिची काळजी घेणार... तिचे काय भविष्य असेल... असे भलेमोठे अवघड प्रश्न समोर आ वासून उभे आहेत... आणि आपण केवळ एक प्रेक्षक होऊन या घडामोडी बघण्यापलिकडे काही करु शकत नाही... हे वास्तव आहे.
बापाने सोडले तर जन्मदात्या आईने टाकले या चिमुकलीला
- डॉ. सी. एस. बार्गल यांच्या क्लिनिकमध्ये या चिमुकलीसह तिची आई आली होती. जन्मदाती आईच या चिमुकलीला या क्लिनिकमध्ये सोडून निघून गेली.
- माझ्या आईवर उपचार करण्यासाठी आली आहे, असे या महिलेने डॉक्टरच्या पत्नीला सांगितले होते. ती चौकातून येत आहे. तिला मी रस्ता पार करण्यासाठी मदत करते. तोपर्यंत हिला सांभाळा, असे म्हणून ही महिला पोटच्या पोरीला सोडून निघून गेली.
- त्यानंतर बराच वेळ गेल्यानंतरही ही महिला परत आली नाही. त्यानंतर डॉक्टरांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. मुलीला चाईल्ड लाईनला सोपवले.
असे आहे संपूर्ण प्रकरण
- मोनिशा यादव असे या चिमुकलीच्या आईचे तर जितकुमार असे वडीलांचे नाव आहे. या चिमुकलीचे नाव अंशिता आहे.
- मोनिशाच्या भावाने जितकुमारकडून खुप कर्ज घेतले होते. ते चुकते करण्यासाठी तो दबाव टाकत होता.
- या दरम्यान त्याने सांगितले, की कर्ज फेडता येत नसेल तर तुझ्या बहिणीचे माझ्याशी लग्न लावून टाक.
- त्यानंतर मोनिशाच्या भावाने तिचे लग्न जितकुमारशी लावून दिले. एका मंदिरात दोघांचे लग्न झाले.
- लग्नानंतर काही दिवस सगळे चांगले होते. त्यानंतर जितकुमार तिला मारहाण करु लागला.
- तिला तो मोलकरणीसारखा वागवू लागला. अंशिता झाल्यावर तर तो प्रचंड चिडला होता. मुलगी झाल्याने त्याने दुसरे लग्न केले.
- जितकुमारने नवा संसार थाटला. तो मोनिशा आणि अंशिताकडे दुर्लक्ष करु लागला.
मोनिशा भावाकडे परतली
- जितकुमारने दुसरे लग्न केल्याने मोनिशा भावाच्या घरी परत आली. पण तिला येथेही चांगली वागणूक मिळाली नाही.
- ती वेगळी राहू लागली. तिने एक खोली भाड्याने घेतली. एका बुटीकमध्ये नोकरी करु लागली. पण पैसे फार थोडे मिळालायचे.
- या दरम्यान तिची ओळख एका तरुणाशी झाली. जितकुमारशी लग्न होण्यापूर्वी तिचे या तरुणाशी लग्न पक्के झाले होते. पण तिच्या भावाने हे लग्न तोडले होते.
- या तरुणाने मोनिशाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्याने अंशिताला स्वीकारण्यास नकार दिला. आता दोघांमध्ये अंशिता अडसर झाली होती.
- त्यानंतर मोनिशाने सुखी संसारासाठी अंशिताला सोडण्याचा निर्णय घेतला. तिला डॉक्टरच्या बायकोकडे सोडून पोबारा केला.
- आता जितकुमार आणि मोनिका दोघेही तिला स्वीकारण्यास तयार नाहीत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अंशिताचे फोटो... जगाचे ज्ञान होण्यापूर्वीच या चिमुकलीला आयुष्याच्या वास्तवाला सामोरे जावे लागले.... आता काय होईल तिचे....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...