आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आईने जिवंत मुलीला थैलीत टाकून फेकले होते नाल्यात, आता मिळाली शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहा महिन्याच्या आरोहीची हत्या तिची आई रितू आहूजाने केला. - Divya Marathi
सहा महिन्याच्या आरोहीची हत्या तिची आई रितू आहूजाने केला.
भोपाळ/जबलपूर - बहुचर्चित आरोही हत्याकांड प्रकरणाची जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. ह्दय पिळवटून देणा-या या प्रकरणात 6 महिन्याच्या मुलीची हत्या तिच्या आईने केला आरोप होता. बुधवारी(ता.29) आपला निकाल देताना अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश राजीव श्रीवास्तव यांनी आरोपी आईला आजीवन तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. वाचा पूर्ण प्रकरण काय आहे...
- दोन्ही हातांना मेहंदी लावून न्यायालयात पोहोचली होती आरोपी आई तुरुंगातून न्यायालयात जाताना या गुन्हेगार महिलेने पोलीस निरीक्षण व फौजदाराला सांगितले होते, की आज मी सुटणार आहे.
- तुरुंगातून मुक्त होण्‍याच्या आनंदात तिने आपल्या दोन्ही हातांवर मेहंदी लावली होती. भांगेत सिंदूर, हातात बांगड्या घालून रितू खूप खूश होऊन न्यायालयात पोहोचली होती.
- मुलीच्या हत्येचा पश्‍चाताप तिच्या चेह-यावर थोडाही दिसत नव्हता.
निकाल असा आला...
- ज्हिा न्यायालय जबलपूरचे अप्पर सत्र न्यायाधीश राजेश श्रीवास्तव यांनी कलम 302 नुसार खूनी आई रितू आहुजा(26) जॅक्सन कंपाऊंड, सिव्हिल लाईनला आजीवन तुरुंगाची शिक्षा सुनावली व 5 हजार रुपये दंड देण्‍याचा आदेश दिला आहे.
- सरकारी वकील एल एस ठाकूर म्हणाले, आईने आपल्या निष्‍पाप मुलीला 7 सप्टेंबर 2014 रोजी नयागावच्या नाल्यात फेकले होते.
- यात त्या तान्हुलीचा मृत्यू झाला होता. मुलीला घेऊन जाताना ती एका ब्युटी पार्लरच्या सीसीटीव्ही कॅमे-या कैद झाली.
पहिल्या दिवसापासून संशयास्पद होते आईचे विधान
- 7 सप्टेंबर 2014 रोजी सिव्हिल लाईन्स पोलीस स्थानका अंतर्गत जॅक्सन कम्पाउंड मध्‍ये राहणा-या सुशील आहुजाची 6 महिन्यांची तान्हुली आरोही रहस्यमय पध्‍दतीने घरातून बेपत्ता होते.
- घटनेच्या प्रथम दिवसापासून बेपत्ता मुलीची आई रितूची साक्ष संशयास्पद वाटू लागले होते. यामुळे तपास प्रक्रिया गुंतागुंतीची बनली होती.
- घटनेच्या दहाव्या दिवशी सकाळी पोलिसांनी रितूला ताब्यात घेतले व तिची कसून चौकशी करण्‍यात आली.
- जवळपास एक तास चाललेल्या चौकशीत रितूने पूर्ण घटनाक्रमाचे सत्य सांगितले.
बेबी बॅगेत घेऊन जाऊन फेकले होते नाल्यात
- या प्रकरणी तपास करत असलेल्या पोलिसांनी सर्व चौकातील सीसीटीव्ही कॅमे-यांची तपासणी केली होती.
- जबलपूरच्या रामपूर क्षेत्रातील एका सीसीटीव्ही कॅमे-याच्या रेकॉर्डिंगमध्‍ये गुन्हेगार आईल संशयाच्या घे-यात आणले होते.
- मग आता रितूकडून घटनेच्या दिवसाचा घटनाक्रमाविषयी पोलिसांनी विचारपूस करुन ते पुनर्पडताळणी केले असता सत्य समोर आले.
- ती एका बेबी बॅगसोबत घरातून जाताना दिसली. परंतु परताना तिच्याकडे बॅगसोबत नव्हते. यामुळे पोलिसांनी संशय खरा ठरला.
- फुटेजच्या आधारावर रितूशी चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला. तिने सांगितले, की आरोहीला बरगी हिल्सहून जिवंत आणल्यावर तिला एका नाल्‍यात फेकल्याचे मान्य केले होते.
- साक्षीच्या आधारावर पोलिसांनी 16 सप्टेंबर रितूला आरोहीची हत्येच्या आरोपात अटकेच्या घटनास्थळाहून 6 महिन्यांच्या मुलीचे शव मिळाले होते.
फुटेज महत्त्वाचा पुरावा ठरला
- या प्रकरणात 16 सप्टेंबर 2014 पासून अटकेत असलेली रितू आहुजाला उच्च न्यायालयाने दोन वेळा जामीन अर्ज फेटाळला होता.
- पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यावर जिल्हा सत्र न्यायालयात 23 सप्टेंबर 2016 मध्‍ये शेवटची सुनावणी झाली.
- आरोपी रितू आहुजाच्या बाजूने नरेंद्र निखारे व राज्य सरकारच्या वतीने एलएस ठाकूर यांनी खटला लढवला.
- खटल्यातील साक्ष व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर न्यायालयाने खूनी आईला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...