आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 वर्षीय प्रियकरासोबत हॉटेलात गेली 5 मुलांची आई, रूममध्ये केली आत्महत्या...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
40 वर्षीय प्रेयसीने विष प्राशन करून आत्महत्या केली. इनसेट - प्रियकर विनोद. - Divya Marathi
40 वर्षीय प्रेयसीने विष प्राशन करून आत्महत्या केली. इनसेट - प्रियकर विनोद.
नीमच/इंदूर - पाच मुलांची आई असलेली महिला आपल्या प्रियकरासोबत रावता भाटा येथून पळून नीमचला गेली. तेथे बस स्टँडजवळच्या एका हॉटेलमध्ये विष प्राशन करून तिने आत्महत्या केली. प्रियकरानेही विष घेतल्याचे सांगितले जात आहे, परंतु तो वाचला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रेमीयुगुलाने विष का घेतले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
- रावता भाटाचा रहिवासी विनोद रामभरोसे कोळी (22) शनिवारी संध्याकाळी बस स्टँडजवळच्या गुरुकृपा या हॉटेलमध्ये रेखा (40)
सोबत आला होता. रजिस्टरमध्ये या दोघांना पती-पत्नी म्हणून नोंद केली होती. तसेच बादल्यांचा व्यवसाय असल्याचे सांगितले होते.
- विनोद म्हणाला की, सोमवारी दुपारी एक वाजता रेखाने कचोरी खाण्याचा हट्ट केला. यावर मी कचोरी आणण्यासाठी बाहेर गेलो. 20 मिनिटांनी परत आल्यावर पाहिले तर रेखाच्या हातात विषाची बाटली होती आणि तिच्या तोंडातून फेस येत होता. मग मीसुद्ध तिच्या हातातले विष प्यायलो. आजूबाजूचे लोकं ओरडणे ऐकून धावले आणि त्यांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. यादरम्यान रस्त्यातच महिलेचा मृत्यू झाला, तर विनोदची प्रकृती गंभीर आहे.
- सूत्रांनुसार, घरी जाण्यावरून दोघांत सकाळी वाद झाला होता. बदनामीच्या भीतीपोटी महिलेने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी दोघांच्याही कुटुंबीयांना कळवले आहे.
 
3 वर्षांपासून सुरू होते प्रेमप्रकरण
- दोघांत मागच्या तीन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. विनोद रावत या तरुणाचा रावत भाटामध्ये फळांचा गाडा आहे. येथेच रेखा नेहमी फळांच्या खरेदीसाठी नेहमी येत असे. दोघांत हळूहळू प्रेमसंबंध निर्माण झाले. प्रेमाने परिसीमा गाठली आणि या दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. रेखा या महिलेला 5 मुले आहेत. यात दोन मुले आणि तीन मुली आहेत. विशेष म्हणजे, महिलेच्या एका मुलाचे लग्न दोन महिने अगोदर झाले आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा घटनेचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...