आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MP: बाळ जिवंत होईल या आशेपोटी 3 दिवस मंदिरात मृतदेह घेऊन बसली आई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - अंधश्रद्धा ही किती पराकोटीची असते याचे उदाहरण येथील पशुपतिनाथ मंदिरात पाहायला मिळाले. एक महिला दोन महिन्यांच्या मृत बाळाला घेऊन मंदिरात बसलेली होती. तिच्यासोबत तिचे वृद्ध आई-वडीलही होते. बुधवारी एका व्यक्तीने पोलिसांना याची माहिती दिली, त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. अंधश्रद्धाळू मातेने सांगितले, की बाळ पुन्हा जिवंत होईल या आशेने मंदिरात बसून होते.

कुठली आहे घटना, काय झाले होते..
- ही घटना मंदसौर येथली पशुपतिनाथ मंदिरातील आहे. बाळाचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
- पोलिसांनी सांगितले, की महु येथील 67 वर्षीय नेमीचंद्र अग्रवाल हे त्यांची पत्नी शारद आणि 30 वर्षांची मुलगी ज्योतीसह मंदिरात बसलेले होते.
- ज्योतीच्या कुशीत कपड्याने पूर्ण झाकलेले एक बाळ होते. पोलिसांनी तिला बाळाच्या चेहरा दाखवण्यास सांगितला.
- तिने बाळाच्या चेहऱ्यावरील कपडा दूर करताच दुर्गंधी पसरली. त्यानंतर पोलिस तिघांनाही पोलिस स्टेशनला घेऊन गेले.
कोणी दिला मंदिरात जाण्याचा सल्ला
- ज्योती आणि तिच्या आईने सांगितले, कोणीतरी आम्हाला मंदिरात जाऊन पूजा करण्यास सांगितले. पशुपतिनाथ मंदिरात जाऊन पूजा केली तर आजारी मुलाचा प्राण परत येईल असे सांगितले गेले होते.
- त्यामुळे सोमवारी सकाळी आम्ही येथे आलो. ज्योतीने सांगितले, की सासरच्या मंडळींसोबत पटत नाही त्यामुळे पतीला घेऊन किरायाच्या घरात राहाते. सध्या माहेरी आले होते.
- तिची आई शारदा म्हणाली, मुलीचे दुःख पाहावत नव्हते. त्यामुळे आम्हीही तिच्यासोबत आलो.
- चौकशीत तिघांनी बाळाच्या पित्याबद्दल माहिती दिली. बाळाचे डील राजा अग्रवाल महु येथे मजुरी करतो.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधित फोटो
बातम्या आणखी आहेत...