आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हशीची चोरी करून चंबळ पार करताना शेपूट सुटल्याने वाहून गेले २ चोर, म्हशी पोलिस ठाण्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुरैना (मध्य प्रदेश) - मुरैना जिल्ह्यातील दोघे चोर म्हशीची चोरी करण्यासाठी चंबळ नदी पार करून राजस्थानात पोहोचले. परतीच्या वाटेवर नदी पार करताना त्यांनी चोरलेल्या म्हशीच्या शिंगावर एक पॉलिथीन बांधून त्यात स्वत:चे मोबाइल, कपडे, चप्पल, डायरी, पर्स आदी वस्तू ठेवल्या. म्हशीची शेपटी धरून चंबळ पार करताना नदीत पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने चोरांचा हात निसटला आणि ते बेपत्ता झाले. म्हैस मात्र नदी पार करून चोरांच्या सामानासह किनाऱ्यावर आली. तेथील एका व्यक्तीने म्हशीची माहिती अंबाह पोलिसांना दिली.
राजस्थान पोलिस सोमवारी म्हशी घेण्यासाठी मुरैनातील अंबाह ठाण्यात पोहोचले. मालकाने म्हशीबाबतचे पुरावे दिल्यानंतर राजस्थान पोलिसांना म्हैस सोपवण्यात आली. अंबाह पोलिसांना शिंगावरील साहित्यावरून चोरांची ओळख पटली. चोरटे मुरैना जवळील रिठोरा गावातील रहिवासी आहेत. शुक्रवार-शनिवारच्या रात्री मुरैनाहून राजस्थान धोलपूर जिल्ह्यातील देहोली ठाण्यातील अतरौली येथे ते पोहोचले. तेथून त्यांनी शेतकरी तीरनसिंह लोधी यांची म्हैस चोरली. चंबळ नदी पार करताना पाण्याचा प्रचंड प्रवाह असल्याने यात ते वाहून गेले. म्हैस मात्र किनाऱ्यावर पोहोचली. ती कुथियाना गावातील विपती शर्मा यांना मिळाली. तिच्या शिंगावर एक पॉलिथीन बांधलेलीच होती. शर्मा यांनी म्हशीची माहिती अंबाह पोलिसांना दिली. म्हशीचा मालक तिचा शोध घेत कुथियानामध्ये पोहोचला. परंतु अंबाह पोलिसांनी त्याला म्हैस दिली नाही. सोमवारी राजस्थान देहोली पोलिस व लोकप्रतिनिधी वीरेंद्र पाराशर यांच्यासोबत आल्यानंतर म्हैस त्यांना सोपवण्यात आली.
म्हशीसोबत चोरट्यांचे मिळालेले साहित्य
{एक जोडी चप्पल व बूट
{ २ मोबाइल, पाकिटात ५६० रुपये
{ चोरट्यांचे पँट आणि शर्ट
{ एक डायरी
{ पोलिसांच्या मते, म्हशीची किंमत जवळपास ६० हजार रुपये आहे.
बातम्या आणखी आहेत...