आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थाटात केली होती मुलीची पाठवणी, डेड बॉडी काढली तेव्हा अशी झाली वधू पित्याची स्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर/देवास - सात तासांपूर्वी लाल रंगाच्या वधू पोषाखात मुलीची पाठवणी केलेल्या पित्याला पांढऱ्या कपड्या गुंडाळलेला तिचा मृतदेह पाहून अश्रू अनावर झाले होते. त्यांना काही म्हणायचे होते, मात्र फक्त डोळ्यातील आसवं बोलत होती. त्यांच्या तोंडून काहीच शब्द निघाले... ते म्हणाले, 'मुली मी तुला घरातून विदा केले होते, तू तर जग सोडून गेली...'

इंदूर येथील शिवनारायण ठाकूर यांची मुलगी रुपाचे लग्न तिल्लौर येथील दिनेशसोबत बुधवारी रात्री लागले होते. त्याच रात्री नवरदेव दिनेश नववधू रुपाला घेऊन मदानाला निघाला होता. सात फेरे घेऊन अवघे सात तास झाले असताना वधू पित्याला मुलगी आणि जावयाचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी कळाली. त्यांचा यावर विश्वासच बसला नाही. त्यांनी दिनेशला फोन केला. मात्र फोन लागत नव्हता. त्यांनी दिनेशच्या वडिलांना फोन केला, तर पलिकडून फक्त रडण्याचा आवाज येत होता. ते ऐकताच शिवनारायण यांच्या डोळ्यातूनही अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ते काही नातेवाईकांसोबत देवासला निघाले.

आतातर पाठवणी केली होती..
नववधू म्हणून जिची पाठवणी केली त्या मुलीला पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल पाहिल्यानंतर त्यांची शुद्ध हरपली. दोन तासांनंतर शुद्धीवर आल्यानंतर ते ओक्साबोक्शी रडू लागले आणि म्हणू लागले, 'आताच तर घरातून तुझी पाठवणी केली होती, तु तर जगच सोडून गेली.'

सारंगपूरला असताना कळाले - सर्वकाही संपले आहे
नवरदेवाचा भाऊ दिपकने सांगितले, की सर्व वऱ्हाडी एक बसमध्ये होते. बस कारच्या पुढे होती. कार चहा-नाश्तासाठी देवास येथे थांबली होती आणि आम्ही पुढे निघून आलो. आम्ही सारंगपूरपर्यंत पोहोचलो तेव्हा यांचा फोनही लागत नव्हता. आम्ही एक तास त्यांची वाट पाहात होतो. त्यानंतर पोलिसांचा फोन आला आणि त्यांनी दुर्घटनेची माहिती दिली. ते ऐकताच जणू माझ्या पायाखालची जमीन सरकली होती.

माहेरी झाले रुपावर अत्यंसंस्कार
रुपाचे लग्न होऊन ती प्रथमच सासरी निघाली होती, आणि रस्त्यातच काळाने तिच्यावर घाला घातला. त्यानंतर तिच्यावर माहेरी अत्यंसंस्कार करण्याचा निर्णय तिच्या नातेवाईकांनी घेतला. तर, सासरकडच्या मंडळींचे म्हणणे होते, की आता तिचे लग्न झाले, आमच्याच घरातून तिची अंत्ययात्रा निघेल, मात्र माहेरच्या मंडळींनी याला विरोध केला आणि ते तिचा मृतदेह इंदूरला घेऊन आले.

नवरदेवाच्या दोन्ही बहिणींचे लग्न ठरले होते
- वराचा चूलत भाऊ दिलीप म्हणाला, दिनेशच्या दोन्ही बहिणींचे - राधा आणि रेखा यांचे 26 एप्रिलला लग्न ठरले होते. राधाचा भावासोबत कार दुर्घटनेत मृत्यू झाला तर रेखा बसमध्ये होती. घरावर एवढे मोठे दुःख कोसळले असल्यामुळे अजून रेखाच्या लग्नाचा निर्णय झालेला नाही.

अशी झाली दुर्घटना
- दिनेशचे वडील मनोहर चौहान यांनी सांगितले, की बुधवारी उशिरा रात्री दिनेश आणि रुपाचे लग्न लागले.
- वधूपिता शिवनारायण ठाकूर यांनी वधू-वराची पाठवणी केल्यानंतर गुरुवारी सकाळी साधारण 11 वाजता पिपलिया रस्त्यावर वराची कार एका ट्रकवर जाऊन आदळली. या दुर्घटनेत वधु-वरासह सातजण ठार झाले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पत्नी, मुलगा आणि मुलीचा मृतदेह पाहून बेशुद्ध पडेल मनोहर चौहान