आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MP CM Shivrajsing Doughter Rinky Wedding In Vidisha

MP: मुख्यमंत्री शिवराजसिंहांच्या मुलीचा विवाह, साधनासिंह यांनी काढली मेंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री शिवराजसिंह यांची दत्तक मुलगी आहे रिंकी. - Divya Marathi
मुख्यमंत्री शिवराजसिंह यांची दत्तक मुलगी आहे रिंकी.
विदिशा/भोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या दत्तक मुलीचा शुक्रवारी विदिशा येथे विवाह झाला. स्वतः शिवराजसिंह आणि त्यांची पत्नी साधना यांनी कन्यादान केले. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीनेच मेंदीचा विधी केला. विशेष म्हणजे, शनिवारी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस होता आणि त्याच्या एक दिवस आधी त्यांच्या मुलीचे लग्न लागले.
- मुख्यमंत्री म्हणाले, विदिशामध्ये आज माझ्या दुसऱ्या मुलीचा रिंकीचा विवाह अभूतपूर्व आनंदात झाला. मी शब्दात तो आनंद व्यक्त करु शकत नाही.
- शिवराजसिंह म्हणाले, 'देवाकडे एकच प्रार्थना आहे, मध्य प्रदेशातील प्रत्येक मुलगी सुखी व्हावी. मुलगा-मुलगी समान असावे.'

गेल्या वर्षीही केला होता आणखी एका दत्तक मुलीचा विवाह
- शिवराजसिंह यांच्या मुखर्जीनगर येथील श्री सुंदरदेवी सेवा आश्रमात रिंकीचा विवाह भंवरलाल मेहरा यांच्यासोबत झाला.
- या आश्रमात मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या त्यांच्या 7 मुली आणि 2 मुले आहेत.
- आश्रमातील सर्वात मोठी मुलगी सोनाचे लग्न गेल्यावर्षी 12 जानेवारी रोजी मोठ्या थाटात झाले होते.

16 वर्षांपूर्वी आश्रमात आली होती रिंकी
- 16 वर्षांपूर्वी जेव्हा शिवराजसिंह खासदार होते, तेव्हा गावकऱ्यांनी सांगितले होते की रिंकीचे मातृ-पितृ छत्र हरवले आहे.
- त्यानंतर मुख्यमंत्री रिंकीसोबत बोलले आणि ती 6 वर्षांची असताना तिला आपल्या विदिशा येथील आश्रमात घेऊन आले.
- येथे तिच्या शिक्षणाची आणि पालन-पोषणाची जबाबादारी शिवराजसिंह यांच्या पत्नी साधना यांनी सांभाळली. रिंकीचे शिक्षण 10 वी पर्यंत झाले आहे.

सोशल मीडियावर लग्नाचे आमंत्रण
- शिवराजसिंह यांनी लग्नाचे निमंत्रण सोशल मीडियावर दिले होते. त्यांच्या निकटवर्तीयांनी व्हॉट्सअॅप वरुन सर्वांना निमंत्रण पाठवले.
- मुख्यमंत्र्यांच्या मुलीच्या विवाहाची जबाबदारी मंत्री रामपालसिंह राजपूत, जिल्हाधिकारी एम.बी.ओझा, पोलिस आयुक्त धर्मेंद्र चौधरी यांनी सांभाळली.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, रिंकीच्या लग्नाचे फोटो आणि मेंदी