आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MP Congress Demands Z Category Security For Narendra Modi`s Wife

नरेंद्र मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांना झेड सुरक्षा द्या, कॉंग्रेस नेत्यांची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांना झेड सुरक्षा द्यावी, अशी मागणी मध्यप्रदेशातील कॉंग्रेस नेत्यांनी केली आहे. जशोदाबेन यांना दहशतवादी टार्गेट करू शकतात. त्यामुळे मध्यप्रदेशचे कॉंग्रेस प्रवक्ता अभय दूबे आणि रवी सक्सेना यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना पत्रद्वारे ही मागणी केली आहे.

जशोदाबेन या चारधाम यात्रेला गेल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्याच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने जशोदाबेन यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, आपण विवाहित असल्याचे नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच लेखी स्वरूपात मान्य केले आहे. बडोद्यात उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या शपथपत्रात मोदी यांनी स्वत:ला 'विवाहित' घोषित केले असून पत्नी म्हणून ‘जशोदाबेन’ नाव लिहिले आहे. तथापि जशोदाबेन यांचा पॅन नंबर, आयकर विवरणपत्रे, मालमत्ता, बँक खाते, म्युच्युअल फंड, विमा पॉलिसी, कर्ज, दागिने, जमीन, घर आदीबाबत आपल्याला माहिती नसल्याचेही मोदी यांनी त्यात म्हटले आहे. मोदी 2002पासून निवडणुका लढवत आहेत. यंदा त्यांची पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. परंतु पत्नीच्या माहितीचा रकाना ते आतापर्यंत रिकामाच सोडत होते. आपल्या वैवाहिक स्थितीबाबत त्यांनी कधीही माहिती दिली नव्हती. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अर्जात संपूर्ण माहिती भरणे सक्तीचे झाले आहे.