आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SELFIEच्या नादात गेला जीव; डोक्यावर बंदूक ठेवून घेत होता सेल्फी, दबले ट्रिगर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - काँग्रेसचे माजी आमदार गोविंदसिंह राजपूत यांचा नातू राहुल उर्फ सूर्यप्रतापसिंह (20) याचा बंदुकीची गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. राहुल डोक्यावर रिव्हॉल्वर ठेवून सेल्फी घेत असताना ही दुर्घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. राहुलचे कुटुंबीय आणि पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवलावरुनही हेच स्पष्ट होत आहे. अद्याप त्याला दुजोरा मिळालेला नाही.

काय आहे प्रकरण ?
20 वर्षांचा राहुल उर्फ सूर्यप्रतापसिंह राजपूत त्याच्या काकांच्या परवाना असलेल्या रिव्हॉल्वरसह सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याने डोक्यावर बंदुकीची नळी ठेवलेली होती, तेव्हाच अचानक ट्रिगर दबल्यामुळे एक गोळी थेट त्याच्या डोक्यात घुसली आणि दुसरी कपाटात. तीन सेकंदाच्या अंतराने दोन गोळ्या चालल्या. पोलिसांच्या प्राथमिक अहवालानुसार हा अपघात आणि अत्महत्येचा प्रकार असून ते त्या दृष्टीने तपास करत आहेत.

गोविंदसिंह राजपूत हे सागर येथील माजी आमदार आहेत. जिल्ह्यात त्यांच्या कुटुंबाचा राजकीय दबदबा आहे. गेली लोकसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर लढविली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. राहुल नुकताच मध्यप्रदेशातील पीईटी पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाला होता. तो काका मूरत सिंह उर्फ पप्पू यांच्यासह सागर येथून इंदूरला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी निघाला होता. मात्र जोरदार पावसामुळे ते काकाच्या भोपाळ येथील घरी मुक्कामी थांबले होते आणि तिथेच ही दुर्घटना घडली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधीत छायाचित्रे
बातम्या आणखी आहेत...