आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधियांच्या या महालावर पडला होता INCOME टॅक्सचा छापा, राजमाताला केले होते तिहारमध्ये कैद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजयाराजे सिंधियांचे जयविलास पॅलेस - Divya Marathi
विजयाराजे सिंधियांचे जयविलास पॅलेस
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) - देशातील आणीबाणीच्या काळात इतरांप्रमाणे सिंधिया राजघराण्यावरही काँग्रेसची वक्रदृष्टी झाली होती. माधवराव सिंधियांच्या मातोश्री राजमाता विजयाराजे सिंधिया तत्कालिन जनसंघाच्या मोठ्या नेत्या होत्या. त्याचाच बदला काँग्रेस सरकारने घेतला होता. सरकारने ग्वाल्हेर येथील जयविलास पॅलेसमध्ये छापा टाकायला लावला आणि विजयाराजेंना अटक करुन दिल्लीतील तिहार जेलमध्ये कैद केले होते.
आणीबाणीच्या काळात सिंधिया राजघराण्याच्या लोकांना त्रास देण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तीकर विभागाकडून जयविलास पॅलेसवर छापा टाकायला लावला. महालातील किंमती वस्तू जप्त केल्या. महालातील सोने देखील प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले. त्यांनी हे सोने तस्करीचे असल्याचा आरोप केला होता. त्याआधी काही दिवसांपूर्वीच राजमाता विजयाराजेंनी 1000 हजार तोळे सोने भारत सरकारला दान दिले होते. राजमातांनी त्यांच्या पुस्तकातही याचा उल्लेख केलेला होता. त्यांना हे सर्व कोर्टात सिद्ध करण्यासाठी नऊ वर्षे लागली. या धाडसत्रात त्यांच्याकडील एक अर्धाकिलोचे सोन्याचे नाणे गायब झाले होते. त्याबद्दल राजमातांनी सांगितले होते, की शाहजहांनचा ते एकमेव नाणे होते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील त्याची नोंद होती.
याचा बदला राजमाताने असा घेतला
राजमाता विजया राजेंना आणीबाणीच्या काळात फार त्रास देण्यात आला होता. जेव्हा आणीबाणी संपली तेव्हा त्यांनी इंदिरा गांधींविरोधात रायबरेली येथून निवडणूक लढली होती. वास्तविक यात विजया राजेंचा पराभव झाला. याबद्दल असे सांगितले जाते, की त्यांच्याच लोकांनी त्यांना धोका दिला होता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, जयविलास पॅलेसचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...