आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MP : Green Corridor Created To Send Heart And Liver

प्रथमच हृदयाने केला 600 किमीचा प्रवास; 3 शहरात प्रथमच ग्रीन कॉरिडॉर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- २० वर्षांची सोनिया स्वत:ची प्राणज्याेत विझवून गेली, पण तिने दोघांच्या आयुष्याला नवा प्रकाश दिला. तिचे धडकते हृदय ६०० किमी लांब मुंबईत पोहोचले आणि १७ वर्षीय मुलीच्या हृदयात नवा श्वास घेऊ लागले. यकृत दिल्लीत पोहोचवले गेले. डोळेही इंदूरच्या कुणाचे तरी आयुष्य रोशन करतील. मुलगी ब्रेन डेड झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी अवयव दान करण्यास संमती दिली. देशात प्रथमच तीन शहरांदरम्यान ग्रीन कॉरिडाॅर बनवला गेला.

पहिला ग्रीन कॉरिडॉर : इंदूर-मुंबई
डॉक्टरांनुसार, २० वर्षांची सोनिया चौहान अपस्माराने ग्रस्त होती. शनिवारी इंदूरच्या चोइथराम रुग्णालयाने तिला ब्रेन डेड घोषित केले. यानंतर इंदुरात रविवारी सकाळी ७.२० वा. रुग्णालय ते विमानतळापर्यंत ग्रीन कॉरिडॉर बनवला. विमानतळापर्यंतचे ९ िकमीचे अंतर केवळ ८ मिनिटे ५० सेकंदांत कापण्यात आले. ७.४० चे विमान १ तास १० मिनिटांत मुंबई विमानतळावर पोहोचले. येथून हृदय ९.०५ वाजता फोर्टिस रुग्णालयात आणून प्रत्यारोपित करण्यात आले. ११ वाजता ते दुसऱ्याच्या शरीरात धडकू लागले.

दुसरा कॉरिडॉर : इंदूर-दिल्ली
दुसरा ग्रीन कॉरिडाॅर इंदूर ते दिल्लीदरम्यान बनवण्यात आला. ग्रीन बॉक्समध्ये यकृत रुग्णालयातून विमानतळासाठी ७.४३ वाजता रवाना करण्यात आले. ८ मिनिट १० सेकंदांत ते विमानतळावर पोहोचले. ८.२५ च्या विमानाने ते दिल्लीच्या द इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलियरी सायन्समध्ये नेण्यात आले. रुग्णालयात निश्चित वेळी पोहोचण्यासाठी तेथेही ग्रीन कॉरिडॉर बनवावा लागला. ९.५० ला ते सहा तासांच्या शस्त्रक्रियेनंतर एका रुग्णावर प्रत्याराेपित करण्यात आले.

कमीत कमी अवयव दुसऱ्याला कामी येतील
पिता गणेश चौहान म्हणाले, सोनिया बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. १ डिसेंबरला ती पडली होती. उपचार केले पण डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड घोषित केले. यानंतर अवयवदानाबद्दल माहिती मिळाली. आपल्या मुलीचे अवयव कमीत कमी दुसऱ्याच्या शरीरात तरी जिवंत राहतील, असा दिलासा मनात कायम राहील. यासाठी दुसऱ्यांनीही समोर आले पाहिजे.

येथे दानकर्ता कुटुंबाचा उतरवला जातो विमा
अवयवदान आणि देहदान करणाऱ्या कुटुंबाचा वैद्यकीय विमा उतरवला जाणारे इंदूर देशातील पहिले शहर आहे. विभागीय अायुक्त संजय दुबे यांनी राज्यात प्रथमच अवयवदान करणारी सोसायटी बनवली आहे. वेबसाइटही लाँच केलेली आहे. त्याच्याशी शहरातील डॉक्टर, रुग्णालये आणि एनजीओ जोडल्या. येथे अवयवदान करणारे व गरजू रुग्णांची माहिती दिली जाते. त्याचा खर्च सोसायटी करते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, अशी केली वाहतूकीची योजना..