आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MP HC Dismisses PIL Against Sachin Tendulkar\'s Bharat Ratna

भारतरत्न प्रकरणी सचिन तेंडुलकरला दिलासा , हायकोर्टाने फेटाळली याचिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जबलपूर- मध्य प्रदेश हायकोर्टाने मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरविरूद्धची जनहित याचिका फेटाळून लावली आहे. सोमवारी हायकोर्टाचे जस्टिस राजेंद्र मेनन व जस्टिस एस के गुप्ता यांच्या खंडपीठाने या याचिकेला हस्ताक्षेपास अयोग्य असल्याचे सांगत ही याचिका फेटाळून लावली आहे. तसेच याचिकाकरत्यांनाही निर्देश दिले आहेत की, त्यांना काही शंका असल्यास ते केंद्र सरकारकडे आपले म्हणने मांडूशकतात.
भारतरत्नवर उपस्थित केले होते प्रश्न चिंन्ह:
काही महिन्यानपूर्वी भोपाळच्या व्हीके नस्वा यांनी ही याचिका दाखल केही होती. यात त्यांनी म्हटले होते की, सचिन तेंडुलकर हा क्रिकेट जगताचा महानायक आहे. एवढेच नाही, तर त्याने अनेक जागतीक विक्रमही प्रस्थापित केले आहेत. तो भारताचा स्टार असून, समाजात प्रचंड लोकप्रिय देखील आहे. मात्र, भारतरत्न देऊन त्याचा सन्मान करण्यात आलेला असतानाही, तो विविध उत्पादनांच्या जाहिराती करत आहे. असे असताना त्याच्या नावाच्या आधी भारतरत्न लिहिले जात आहे. हे योग्य नाही. दाखल केलेल्या याचिकेत म्हटले गेले आहे की, सचिन तेंडुलकरने नैतिकतेने भारतरत्न अवॉर्ड परत केला पाहिजे. मात्र तो स्वतःच भारतरत्न परत करणार नसेल तर, त्याच्याकडून हा सन्मान काढून घेतला जावा.
कोर्टाने फेटाळली याचीका.
याचिका कर्त्याकडून सर्वोच्च न्यायालयच्या संवैधानिकपीठाच्यावतीने 15 डिसेम्बर 1995मध्ये पारित करण्यात आलेल्या आदेशाच्या प्रतियाचिकेत म्हटले आहे. की, भारतरत्न हा अवॉर्ड आहे. टायटल नही. म्हणून याचा उपयोग नावाच्या समोर अथवा मागे केलाजाऊशकत नाही. खंडपीठाने या याचिकेला हस्ताक्षेपास अयोग्य असल्याचे सांगत फेटाळून लावले आहे.
याचिकाकर्त्याने सांगितले की, आता ते केंद्र सरकारला विनंती करणार आहेत. मात्र केंद्राकडूनही समाधाव झाले नाही तर, ते सर्वोच्च न्यायालयात सचिन तेंडुलकरच्या विरोधात याचिका दाखल करणार आहेत.