आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

400 मुलांचा जीव वाचवण्यासाठी तो बॉम्ब खांद्यावर घेऊन 1 KM धावला, पाहा व्हिडिओ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - मध्यप्रदेश पोलिसांतील एका कॉन्सटेबलच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्याने आपला जीव धोक्यात टाकून तब्बल 400 मुलांचा जीव वाचवला आहे. भोपाळपासून 170 किमी दूर सागर येथे एका शाळेच्या आवारात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. पोलिस तर घटनास्थळी दाखल झाले. मात्र, बॉम्बशोध पथक उपलब्ध नव्हते. अशात वेळ वाया न घालवता पोलिस कॉन्सटेबल अभिषेक पटेल पुढे आला. त्याने आपल्या जिवाची परवा न करता तब्बल 10 किलोंचे बॉम्ब आपल्या खांद्यावर ठेवले. 1 किमी पर्यंत धावून ते बॉम्ब शाळेच्या आवारापासून निर्जन स्थळी फेकले. हिरो कॉन्सटेबलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
 
>> ही घटना चितोरा गावातील सरकारी शाळा परिसरात शुक्रवारी घडली आहे. त्याचा व्हिडिओ मात्र, दोन दिवसांनंतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
>> याबाबत सविस्तर वृत्त असे, की सरकारी शाळेत बॉम्ब सापडल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. यावर वेळीच कॉन्सटेबल अभिषेक पटेल यांच्या नेतृत्वातील पोलिस पथक शाळेत दाखल झाले.
>> घटनास्थळी 12 इंच आकाराचा आणि जवळपास 10 किलो वजनाचा बॉम्ब होता. बॉम्बशोध वेळीच बोलावणे शक्य नसल्याचे पाहता पटेल यांनी चक्क जिवंत बॉम्ब उचलून आपल्या खांद्यावर ठेवला. 
>> तब्बल 400 मुलांची जीव वाचवण्यासाठी त्यांनी खांद्यावरच ठेवून तो बॉम्ब 1 किमी धावून नेला. तसेच शाळेचा परिसर सुरक्षित केला. या क्षण सगळेच विद्यार्थी, पालक आणि सोबतचे पोलिस पाहत होते. त्यापैकीच काहींनी तो कॅमेऱ्यात टिपला.
>> व्हिडिओमध्ये अभिषेक पटेल धावताना दिसत आहेत. त्यांच्या मागे त्यांचे सहकारी सुद्धा धावून गेले. काही अंतरावर जाताच पटेल यांच्या टीमचे सदस्य त्यांना बॉम्ब तेथेच फेकण्याचे ओरडून सांगत होते. मात्र, पटेल 1 किमी दूर पर्यंत थांबलेच नाही. 
>> हा बॉम्ब कुठून आला आणि कुणी ठेवला याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. वरिष्ठ पोलिस अधिकारी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. 
>> तर दुसरीकडे, पोलिस कर्मचारी पटेल यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यांच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी बॉम्बच्या तक्रारीनंतर घटनास्थळी गेलेल्या आणि अभूतपूर्व धाडस दाखवलेल्या अख्ख्या टीमचा सत्कार करणार असे जाहीर केले. 
बातम्या आणखी आहेत...