आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन तलावांमध्ये होता बादशहाचा हरम, महालात राहात होत्या 1000 महिला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जहाज महाल - Divya Marathi
जहाज महाल
मांडू/इंदूर - भारत हा प्राचीन इतिहास आणि वास्तूंनी संपन्न देश आहे. देशात अशी अनेक स्मारके आहेत, ज्यांच्या भिंती आजही त्यांचे ऐतिहासिक संदर्भ जपून आहेत. या वर्षी 13 एप्रिल रोजी केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने देशातील 25 आदर्श स्मारकांमध्ये जहाज महालचा समावेश केला. या स्मारकांच्या विशेष देखरेखीचे काम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे (ऑर्कालॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) सोपवले आहे. मात्र आर्थिक तरतूद न झाल्यामुळे अजूनपर्यंत कामाला सुरुवात झाली नाही. मात्र मंत्रालयाने एएसआयला पुढील आर्थिक वर्षात निधीची तरतूद केली जाईल असे आश्वासन दिले आहे. येथे 2014-15 या वर्षात 397803 देशी आणि 2802 विदेशी पर्यटकांनी भेट दिली. या आर्थिक वर्षात ही संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे.

या निमीत्ताने divaymarathi.com आपल्या वाचकांना जगाच्या नकाशावरील देशातील काही प्रसिद्ध स्मारकांमध्ये गणल्या जाणाऱ्या जहाज महालबद्दल सांगत आहे.

काय आहे जहाज महाल
जहाजाच्या आकारात तयार करण्यात आलेल्या या महालाचे निर्माण 1469 ते 1500 दरम्यान गयासुद्दीन याने केले होते. येथे मुंज आणि कपूर नावाचे तलावांच्या मध्ये हा महाल आहे, त्यामुळे त्याला जहाज महाल म्हणतात. हा महाल विशेषतः महिलांच्या निवासस्थानासाठी तयार करण्यात आला होता. त्याला हरम म्हणतात. असे म्हटले जाते की या महालात एक हजारांपेक्षा जास्त महिला राहात होत्या. या महालाची लांबी 120 मीटर आहे. याचा निर्माता अर्थात अभियंता हा अफगाणिस्तानातून आला होता. महालात दोन स्विमिंग पुल तयार करण्यात आले होते. त्यातील एक पहिल्या मजल्यावर आणि दुसरा छतावर तयार करण्यात आला. या स्विमिंग पुलमध्ये जवळपास 30 हजार लिटर पाणी मावते. महालात कलात्मकतेचा सढळ हाताने वापर करण्यात आला आहे. स्विमिंग पुल हे कमळाच्या आकाराचे आहेत. ते विशेषतः महिलांसाठी बनविण्यात आले आहेत. यांना कमल कुंड देखिल म्हटले जाते. महालात अनेक विहिरी आहेत. यातील एक उजाला बावडी वरच्या बाजूने उघडी आहे. तिचा पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होता. आता या विहिरीच्या पाण्याच्या महालाच्या परिसरातील बागेला पाणी देण्यासाठी उपयोग होत आहे. महालाच्या दोन्ही बाजूला तलाव आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये महाल थंड राहावा या उद्देशाने हे नैसर्गिक एअरकंडिशनींग देखिल म्हणता येईल. त्याच्या दोन्ही बाजूला मोठा बगीचा आहे.
ब्रिटीश काळात खंडर झाला होता जहाज महाल
ग्यासुद्दीन खिलजीकडून तयार करण्यात आलेल्या जहाज महालाकडे ब्रिटीश काळात दुर्लक्ष झाले होते. यामुळे त्याचे रुपांतर एखाद्या खंडरमध्ये झाले होते. 1951 मध्ये भारतीय पुरातत्व विभागाकडे त्याला सोपवण्यात आले. त्यानंतर प्राचीन पद्धतीनूसार, चूना, उडीद दाळ, वाळू, यांचा वापर करुन त्याची डागडुजी करण्यात आली. दोन्ही बाजूच्या बागा विकसित करण्यात आल्या.
पर्यटकांसाठी कोणत्या सुविधा असणार
येत्या आर्थिक वर्षात येथे दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यात ऑडिओ-व्हिज्युवल सेंटर, वायफाय झोन, स्वच्छ पिण्याचे पाणी, बाथरुम आणि शौचालय, लगेज सेंटर, स्मारकाची माहिती देणारे साइन बोर्ड लावले जाणार आहे. मांडूच्या इतिहासाची ऑडिओ क्लिप माफक दरात उपलब्द करुन दिली जाणार आहे. अपंग पर्यटकांसाठी स्मारकापर्यंत जाण्यासाठी लिफ्टची व्यवस्था, जिथे रस्ते नाहीत तिथे नव्या रस्त्यांचे काम हाती घेतले जाणार आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करुन पाहा, कसा आहे जहाज महाल...