आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MP KHAN Buffalo Give 24 Litre Milk Daily Worth Rupee 5 Lac Costly Than A Car

PICS: हजार रूपये \'रोज\' मिळवून देणारी \'कार\' पेक्षाही महागडी म्‍हैस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाढलेली महागाई, न परवडणा-या वैरण व पशुखाद्याच्या किमती, महागडी जनावरे याचा विचार करून सध्‍या शेतकरीही गायी-म्हशी पाळण्‍यास धजावत नाही. दुष्‍काळाच्‍या झळा शेतकरी सहन करत असल्‍यामुळे दुग्‍धव्‍यावसाय मोडकळीस आला आहे. जनावरासाठी चारा उपलब्‍ध नसल्‍यामुळे शेतकरी सध्‍या गाई-म्हशी विक्रीसाठी बाजारात घेऊन जात आहे.
मात्र मध्‍येप्रदेशमधील खरगोन गावातील अजीज खानच्‍या म्हशीची किमंत पाच लाख रूपयापेक्षा जास्‍त आहे. आज बाजारात एक ते दोन लाख रूपयांमध्‍ये कार विकत घेता येते. मात्र अजीज खानची ही म्हैस दिवसाला एक हजार रूपये कमाई करणारी असल्‍यामुळे त्‍याच्‍या म्‍हशीला भाव मिळाला असे बाजारातील जाणकार सांगतात.

महाराष्‍ट्रातील हरून नावाच्‍या व्यक्तिने 4.11 लाख रूपयाला ही म्हैस खरेदी करण्‍याची तयारी दाखवली. प्रत्‍येक दिवशी 24 लिटर दुध देणारी म्‍हैस प्रत्‍येक दिवशी हजार रूपये मिळवून देत असल्‍यामुळे या म्‍हशीला बाजारात मोठी मागणी आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा जाफरी जातीच्‍या म्हशीची छायाचित्रे...