आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • MP Mandsaur Kisan Andolan: Hardik Patel Arrested By Mandsaur Police On Way To Mandsaur

मंदसौरला जाणारे हार्दिक, ज्योतिरादित्यांना अटक; मध्य प्रदेशात कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हार्दिक यांना अटक झाली. उज्जेैनमध्ये शेतकऱ्याची विचारपूस करताना ज्योतिरादित्य. - Divya Marathi
हार्दिक यांना अटक झाली. उज्जेैनमध्ये शेतकऱ्याची विचारपूस करताना ज्योतिरादित्य.
मंदसौर / निमच - मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये पोलिसांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाइकांची भेट घेण्यासाठी जाणारे पाटीदार समुदायाचे नेते हार्दिक पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांना मंगळवारी पोलिसांनी अटक केली.
 
निमच जिल्ह्यातील नयागाव येथील टोलनाक्यावर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. मात्र काही वेळानंतर त्यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटकाही करण्यात आली. तिकडे मंदसौरला जाणारे काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांना अटक झाली. कलम १५१ अंतर्गत ही कारवाई झाली आहे.   
 
काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य, कांतिलाल भुरिया व पक्षाचे इतर कार्यकर्त्यांसह मंदसौरला जात असताना रतलाम जिल्ह्यातील जावरा गावाजवळील मननखेडा टोलनाक्यावर रोखण्यात आले होते. हार्दिक पटेल राजस्थानच्या उदयपूर व निंबाहेडा मार्गे मंदसौर जिल्ह्यातील पिपल्यामंडी पोहोचले होते. गेल्या आठवड्यात पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाइकांना भेटण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र प्रशासनाने त्यांंना भेटीची परवानगी दिली नाही. इंदूरला जाताना ते मंदसौरला जाऊन पीडित पक्षाला भेटण्याचा प्रयत्न करत असल्यास त्यात गैर काय आहे? असा प्रश्न हार्दिक यांनी विचारला आहे. एखाद्याच्या घरात व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला भेटायला जाऊन, संवेदना व्यक्त करण्याचा अधिकार स्वतंत्र भारतात प्रत्येकाला आहे. परंतु मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकशाही देशात लोकशाही मूल्ये नसलेल्या पद्धतीचा अवलंब करत अटकेची कारवाई केली आहे, असा आरोप हार्दिक यांनी केला.

सीएम बुधवारी मंदसौरला जाणार  
मध्य प्रदेशातील मंदसौरमधील शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान अशा शेतकऱ्यांच्या नातेवाइकांची भेट घेणार आहेत. बुधवारी ते मंदसौरला जातील.   

आजपासून काँग्रेसचा सत्याग्रह
मध्य प्रदेश काँग्रेसने १४ जून रोजी ७२ तासांच्या सत्याग्रह करण्याचा निर्धार केला आहे. त्याशिवाय बुधवारी शेतकऱ्यांची महापंचायत देखील आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरुण यादव यांनी दिली.

ठाणे जाळून टाका म्हणणाऱ्या आमदाराविरोधात गुन्हा
मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील करैरा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आमदार शकुंतला खटीक व इतरांवर मंगळवारी हिंसाचार भडकवण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान खटीक यांनी चिथावणीखोर विधान केले होते. पोलिस ठाणे पेटवा, अशी चिथावणीखोर विधान असलेला शकुंतला यांचा व्हिडिआे काही दिवसांपूर्वी जारी झाला होता. त्यानंतर ही कारवाई झाली होती.दरम्यान, चौहान यांच्या सेहोर जिल्ह्यात सोमवारी ५५ वर्षीय शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली.
 
हेही वाचा...
बातम्या आणखी आहेत...