आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शौचालय नसल्यामुळे नववधूने सोडले सासर !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) - उघड्यावर बाहेर शौचास जावे लागण्यामुळे त्रस्त झालेल्या सुनेने सासरच सोडून दिले. कारण एकच तिने लग्नानंतर पति सासरच्या लोकांना सांगितले होते की, घरात शौचालय तयार करुन घ्या पण तिचे कुणी ऐकलेच नाही तेव्हा त्रस्त सुून सरळ तडक माहेरी निघून गेली.
ती गेल्या अनेक दिवसांपासून माहेरीच राहात आहे. आणि तिची अट आहे की, जेव्हा सासरी शौचालय तयार होईल तेव्हाच ती परत सासरी जाईल.हे प्रकरण महिला पोलीस ठाण्यात पोहोचले. जेव्हा पोलिसांना वादाचे कारण सापडले तेव्हा त्यांनी दोन्ही पक्षांना समोर बसविले तेव्हा सासऱ्याने लेखी दिले की ते सवकरच शौचालय बनवतील. रजनी ने देखील शौचालय तयार होताच सासरी जाण्यास सहमती दर्शविली.महिला पोलीस ठाण्याच्या कौन्सिलिंग सेलच्या मतानुसार जडेरुआ येथे राहणारी रजनी जाटव हीचे वर्षापूर्वी सतेन्द्रशी लग्न झाले. ती मुरैनाची आहे.
लग्नानंतर जेव्हा तिला कळले की घरात शौचालयच नाहीये तेव्हा तिने पतीकडे तक्रार केली. पती सासरचे लोक टाळत गेले. रजनीला सासरच्या लोकांची बपर्वाईमुळे उघड्यावर शौचास जावे लागत असे. जेव्हा तिच्या कुठल्याच गोष्टीकडे कुणीही लक्षच दिले नाही तेव्हा मग तिला घरच सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.
बातम्या आणखी आहेत...