इंदूर (मध्य प्रदेश)- या शहरातील गुंडागर्दीविरुद्ध पोलिसांनी अचानक कडक भूमिका घेतली असून रात्री उशीरा ठिकठिकाणी छापे मारले. मध्य प्रदेशचे पोलिस महासंचालक विपिन माहेश्वरी यांनीच पोलिस अधिकाऱ्यांना कठोक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, की आता रिझर्ल्ट हवा. सगळे मैदानात उतरा. लहान गुंडांनाच नाही तर लिस्टेड आणि मोठ्या गुंडांवरही कारवाई करा. त्यांना लोकांमध्ये जाऊन बेदम मारा. जनतेचा पोलिसांवर विश्वास बसायला हवा.
पोलिस महासंचालकांचा आदेश आल्यावर पोलिस अधिकाऱ्यांनी रात्रीच छापे मारण्यास सुरवात केली. गुंडांना घरुन उचलण्यात आले. काही गुंडांनी पळ काढला. सिनेस्टाईल पाठलाग करुन त्यांना पकडण्यात आले. भर रस्त्यांत बेदम मार देण्यात आला. यात काही अधिकाऱ्यांच्या काठ्याही तुटल्या. तरी पोलिस गुंडांना मारताना दिसून येत होते. यावेळी काही लोकांनी टाळ्या वाजवत पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले. एका रात्रीत पोलिसांनी 340 गुंडांना पकडले. त्यातील 75 जणांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, पोलिसांनी गुंडांना कसा दिला बेदम मार... लोकांसमोर काठ्यांनी मार मार मारले...