आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉईज हॉस्टेलमध्ये सापडल्या तरुणी, पोलिसांच्या धाडीनंतर झाला \'गजहब\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदुर (मध्य प्रदेश)- विक्रम विद्यापिठाच्या कालिदास हॉस्टेलवर धाड टाकून पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यासंदर्भात विश्वासार्ह माहिती मिळाल्यानंतर माधवनगर पोलिस ठाण्याच्या इन्चार्ज रेखा वर्मा यांच्या नेतृत्वात धाड टाकण्यात आली. यावेळी काही पुरुष आणि तरुणी अगदी आक्षेपार्ह अवस्थेत दिसून आले.
पोलिसांनी धाड टाकली तेव्हा बोलाई रेल्वे स्टेशनचे मास्टर मनोहरा आणि भाजपच्या युवा आघाडीचे माजी स्थानिक नेते सुधिर यादव बॉईज होस्टेलमध्ये आढळून आले. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. खोली क्रमांक 64 मधून मनोहरा यांना तर खोली क्रमांक 66 मधून यादव यांना पकडण्यात आले. यावेळी काही आक्षेपार्ह फोटोही दोघांजवळ आढळून आले.
दरम्यान, पोलिसांनी धाड टाकल्याचे समजल्यावर माध्यमांचे प्रतिनिधी बॉईज होस्टेलवर आले. त्यांना बघून सर्व आरोपींनी तोंड लपवण्याचा प्रयत्न केला.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, बॉईज हॉस्टेलमध्ये असे सुरु होते सेक्स रॅकेट....