भोपाळ - मध्यप्रदेशातील नरसिंहपूर मध्यवर्ती कारागृहाच्या भिंतीवरुन उडी मारून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला एक कैदी फरार झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैदी भिंतीवरुन उडी मारुन जाताना स्पष्ट दिसत आहे. कैदी फरार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी तुरुंग अधिकारी अमित मिश्रा यांनी त्याचा शोध सुरु केला आहे. त्याला लवकरच पकडण्यात येईल असे मिश्रा यांनी सांगितले.
तुरूंग रक्षकांना लागला नाही पत्ता
कैदी तुरुंगाच्या भिंतीवरुन उडी मारत असल्याचे CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. मात्र, एखादा कैदी पळून जात असल्याची खबर तुरुंग पोलिसांना लागली नाही, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पळून गेलेल्या कैद्याचे नाव पंकज पाहडे असून त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. सहा महिन्यांपूर्वीच त्याला छिंदवाडा कारागृहातून नरसिंहपूर येथे आणण्यात आले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटो ...