आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MP: Seoni Mla Cleans His Hands With Ex Mps Saree

VIDEO: आमदार महोदयांनी माजी महिला खासदारांचा भर सभेत धरला पदर; म्हणाले, थट्टा केली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिवनी (मध्यप्रेदश) - येथील एका अपक्ष आमदाराने जाहीर कार्यक्रमात मंचावरच माजी महिला खासदाराच्या साडीचा पदर धरत हात पुसले. या घटनेनंतर आमदार महोदयांवर टीकेची झोड उठु लागली तेव्हा त्यांनी सारवासारव करताना म्हटले, वहिणींसोबत थट्टा करत होतो, मी त्यांना हात देखील लावला नाही.
काय आहे प्रकरण
सिवनी येथे मंगळवारी शेतकर्‍यांना पीक विम्याच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले. यावेळी मंचावर स्थानिक आमदार दिनेश राय उर्फ मुनमुन यांनी भाजपच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्या आणि माजी खासदार नीता पटेरिया यांच्या साडीचा पदर धरला आणि त्याला हात पुसले. निता यांना या प्रकाराची माहिती देखील नव्हती, कारण त्या पाठमोर्‍या उभ्या असताना आमदार महोदयांनी त्यांच्यासोबत असे वर्तन केले होते. त्याचवेळी ते कॅमेर्‍यात कैद झाले, हे मात्र थट्टा करणार्‍या आमदार मुनमुन यांच्या लक्षात आले नाही.
निता यांना जेव्हा या प्रकाराची माहिती देण्यात आली आणि घटनेची क्लिपींग दाखविण्यात आली तेव्हा त्यांनी दिनेश राय हे आमदार आहेतत आणि त्यांना हे शोभत नसल्याचे म्हटले.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, आमदारांच्या थट्टेचा व्हिडिओ