आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MP Tribal Minister Vijay Shah Quits Over Sexist Remarks

मध्य प्रदेशात वादग्रस्त वक्तव्यावरून मंत्र्यांनी खुर्ची गमावली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- मध्य प्रदेशातील आदिवासी कल्याणमंत्री विजय शाह यांना राजीनामा द्यावा लागला आहे. वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर पक्ष आणि सरकारने त्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. शाह यांनी मंगळवारी रात्री राजीनामा दिला. राज्यपाल रामनरेश यादव यांनी बुधवारी तो मंजूर केला. बेताल वक्तव्य केल्यामुळे मंत्र्याला खुर्ची गमवावी लागल्याची देशात पाच दिवसांतील ही दुसरी घटना आहे. याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मंत्री राजराम पांडेय यांना बडतर्फ केले होते. पांडेय यांनी महिला कलेक्टरच्या सौंदर्याची स्तुती केली होती. दरम्यान, शाह यांनी रविवारी झाबुआ येथे विद्यार्थिनींसमोर बोलताना द्वैयर्थी वक्तव्ये केली होती. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचाही त्यांनी उल्लेख केला होता. नंतर त्यांनी त्यासाठी माफी मागितली होती. परंतु राजीनामा न दिल्यास बडतर्फ करण्याचा इशारा पक्षाने दिला होता.