आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

82 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? सरकारने कानाआड केला होता इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्फोटानंतर रस्त्यावर असे विखूरले होते साहित्य - Divya Marathi
स्फोटानंतर रस्त्यावर असे विखूरले होते साहित्य
इंदूर - मध्यप्रदेशात शनिवारी सकाळी झालेल्या स्फोटात 80 हून अधिक लोकांचा जीव गेला आणि 120 हून अधिक जखमी आहेत. या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. ही सरकारची दिरंगाई असल्याचे समोर येत आहे. या स्फोटांच्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, की स्फोटात शाळकरी मुलांचाही हकनाक बळी गेला असण्याची शक्यता आहे. (सविस्तर बातमी येथे वाचा)

दिरंगाई कशी
मध्यप्रदेशातील झाबुआ येथील पेटलावाद येथील एका दुकानात झालेल्या स्फोट झाला. तिथे सुरुंगासाठी वापरण्यात येणारी स्फोटके ठेवलेली होती. तिथे आग लागली आणि तिने शेजारी असलेल्या हॉटेलला कवेत घेतले आणि होत्याचे नव्हते झाले. रस्त्यावर मृतदेह पडले. आता अशी माहिती समोर येऊ लागली आहे की काही दिवसांपूर्वी लोकांनी एसडीएम कडे तक्रार केली होती. निवासी भागात असलेला स्फोटकांचा कारखाना धोकादायक ठरू शकतो असे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले.
 
सरकारचे तोंडावर बोट
स्थानिकांचे म्हणणे आहे एका लोकअदालतीमध्ये एसडीएम यांना सांगितले होते की एका घरातून स्फोटकांची विक्री होत आहे. कधीही मोठी दुर्घटना घडू शकते. त्यांनाही या धोक्याचा अंदाज होता. आता प्रशासन म्हणत आहे की स्फोटक विक्रेत्याकडे परवाना होता, त्याने केलेला साठा कायदेशीर होता. मात्र सर्व निकषांचे पालन केले होते की नाही यावर सरकार बोलायला तयार नाही.
 
मृतांमध्ये शाळकरी मुले ?
ज्या ठिकाणी घटना घडली त्या परिसरात पाच शाळा आहेत. दुर्घटनेवेळी हजर असलेले विनोद घाग म्हणाले, मुलांचा शाळेत जाण्या-येण्याचा हाच मार्ग आहे. मृतांमध्ये काही शाळकरी मुले असण्याची शक्यता आहे. माझ्या समोर काही मुलांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते.
 
पुढील स्लाइडमध्ये, स्फोटाची दाहकता दाखवणारे फोटो