आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुरहानपूरला उभारला जाणार होता \'ताजमहाल\'; मुमताज यांचा प्रसुतीदरम्यान झाला होता मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: बुरहानपुर येथील जैनाबादेतील मुमताज महालातील मकबरा)
इंदूर- मध्य प्रदेशातील बुरहानपुर जिल्ह्यातील जैनाबाद येथे मुघल राजघराण्याचा पाचवा बादशहा शाहजहानची दुसरी पत्नी मुमताज यांची खरी कब्र आहे. आपल्या 14 व्या अपत्याला जन्म देताना मुमताज यांचा बुरहानपूरला मृत्यु झाला होता. जैनाबाद येथील मुमताज महालात मुमताज बेगम यांना दफन करण्‍यात आले. त्यानंतर ती कब्र उत्तर प्रदेशातील आग्रा येथे हलवण्यात आली होती.


तापी नदीच्या काठावरच बेगम मुमताज यांच्या स्मरनार्थ एक भव्य इमारत बांधण्याची शाहजहान यांची इच्छा होती. यासाठी इराणहून शिल्पकारांना बोलावण्यात आले होते. शिल्पकारांनी तापी नदीच्या किनार्‍याचे निरीक्षण केले परंतु, सर्वत्र काळी माती आढळून आल्याने त्यांनी इमारतीसाठी (ताजमहाल) ही जागा योग्य नसल्याचे सुचवले. त्यानंतर शहाजहानने मुमताजचा मृतदेह बाहेर काढून तो सोन्याच्या पेटीत ठेवला. शाह शुजाच्या संरक्षणाखाली आग्र्याला पाठविण्यात आला. त्यानंतर मृतदेह आग्र्यातील एका छोट्या इमारतीत ठेवण्यात आला. मृत्यूनंतर सुमारे 23 वर्षांनी ताजमहालात मुमताज महलची कब्र बांधण्यात आली.

जैनाबादमध्ये खरी कब्र
मुघल सम्राट शाहजहानची बेगम मुमताजचा मृत्यू आग्रा येथे झाला आणि नंतर त्यांचे पार्थिव तेथेच दफन करण्यात आल्याचे सांगितले जाते. परंतु, मुमताज यांचा मृत्यू मध्य प्रदेशातील बुरहानपुर जिल्ह्यातील जैनाबाद येथे झाला होता. मुमताज यांची कब्र तापी नदीच्या पुर्वेला आजही आहे.

इतिहासकारांनुसार, लोधीने 1631 मध्ये बंडाचा झेंडा फडकवला तेव्हा शाहजहान पत्नी मुमताज महल यांना घेऊन बुरहानपुर आले होते. यादरम्यान मुमताज गर्भवती होत्या. 7 जून 1631 रोजी मुलाला जन्म देताना त्यांचा मृत्यू झाला. दुसर्‍या दिवशी गुरुवारी आहुखाना बागेत त्यांचे पार्थिवावर दफनविधी करण्यात आला. आज ही इमारत भग्नावस्थेत आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, बुरहानपुर येथील जैनाबादेतील बेगम मुमताज महल यांचा मकबरा...